बुधवारी सकाळी तेहरानच्या विमानतळावर युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातात 176 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र इराणने चुकून या विमानावर हल्ला केल्या असल्याचा अमेरिकेचा विश्वास आहे. याबाबत बोलण्यास पेंटॅगॉनने नकार दिला आहे.

  

आज, गुरुवारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना हटवण्यास नकार दिला गेला आहे. मंत्रालयाने सांगितले की, कुलगुरूंना काढून टाकणे हा तोडगा नाही. कॅम्पसमध्ये उपस्थित प्रश्न सोडविणे यावर सरकारचे लक्ष आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थी आणि प्रशासनाच्या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या 'फॉर्म्युला' लागू करणे आवश्यक आहे. कुलगुरूंसह विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मंत्रालयात बोलावण्यात आले असून त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दाव्यांविषयी चर्चा केली जाईल.

महाराष्ट्र केसरी किताब जिंकल्यानंतर हर्षवर्धन सदगीरवर शुभेच्छांचा वर्षाव झाला, कौतुक झाले. मात्र ठरलेल्या बक्षिसाची रक्कम मिळाली नसल्याची माहिती काका पवार यांनी दिली होती. स्पर्धेच्या आयोजकांनी ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला दीड लाख रुपयांचे, तर उपविजेत्याला 75 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र हा किताब जिंकल्यावर हर्षवर्धन सदगीर याला फक्त 20 हजार रुपये देण्यात आले अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. ही गोष्ट शरद पवार यांना समजताच त्यांनी हर्षवर्धन सदगीरला 12 लाखांचा धनादेश त्यांनी दिला आहे.

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत एक धार्मिक वाद उफाळून आला आहे. साहित्य साम्मेलांच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. मात्र त्यांना ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने ज्येष्ठ साहित्यिक ना.धो. महानोर यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहू नये, असा इशारा दिला आहे. याबाबत एक पत्र ब्राह्मण महासंघाने ना.धो. महानोर यांना लिहिले आहे. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी 150 ख्रिस्त धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत, याच गोष्टीला ब्राह्मण महासंघाचा विरोध आहे. 

पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकूल येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अंतिम विजेता मल्ल हर्षवर्धन सदगीर याला 12 लाख रुपयांचे इनाम देण्यात आले आहे.

विम्याचे हाप्ते, सेवा आणि इतर मागण्यांसाठी डोंबिवली शहरात ज्येष्ठ नागरिकांनी आदोल नकेले. यात सेवानिवृत्त कर्मचारी, महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

जिल्हा परिषद निवडणुकीत भारजपचा मोठा पराभव झाला नाही. उलट आगोदरपेक्षा आमच्या जागा वाढल्या आहेत. नागपूरमध्येही आमचे संख्याबळ 21 वरुन केवळ 15 इतके कमी झाले इतकेच. पण आजही राज्यात भारतीय जनता पक्षच सर्वात मोठा पक्ष असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमिवर भाजपची चिंतन बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्यापसून सुरु होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी अज्ञाताकडून ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना मिळाली आहे. ना धो महानोर हे यंदा उस्मानाबाद येथे पार पडत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहित्यस संमेलनाचे उद्घाटक आहेत.

वाहतूक विभागातील  पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे (DIG Nishikant More) यांना पदावरुन निलंबीत करण्यात आले आहे. अल्पवयीन तरुणीचा विनयभंग आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा मोरे यांच्यावर आरोप आहे. आजच्या दिवसात या प्रकरणात  मोरे यांना बसलेला हा दुसरा झटका आहे. निशिकांत मोरे यांनी पनवेल कोर्याकडे संबंधीत प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, पनवेल कर्टाने त्यांचा जामीन अर्ज आज (9 जानेवारी 2019) फेटाळून लावला. त्यामुळे मोरे यांची अटक आता अटळ ठरली आहे. 

राज्याच्या गृहविभागाने निशिकांत मोरे अल्पवयीन तरुणी विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्यातील चालक दिनकर साळवे याला निलंबीत केले आहे. निशिंकात मोरे प्रकरणात साळवी याने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप आहे.

Load More

बुधवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा निकाल लागला. त्यानंतर आज मुंबई महापालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये आज पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 10 जानेवारीला होणार आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या 

या पोटनिवडणुकीकडे सर्व मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे, भाजपचे बबलू पांचाळ, काँग्रेसचे अल्ताफ काझी, एमआयएमचे खान सद्दाम हुसेन इमामुद्दिन आणि समाजवादी पक्षाचे जमीर खान या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.