मध्य रेल्वे (Central Railway) वर आज सकाळी टिटवाळा (Titwala) ते खडवली (Khadavali) स्थानकांच्या दरम्यान अप मार्गावरील रूळाला तडा गेल्याने सीएसएमटी (CSMT) कडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याहून (Kasara) सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्यात आली आहे, त्यामुळेच वासिंद (Vashind) , खडवली , आसनगाव (Asangaon) येथे लोकल गाड्या उभ्या आहेत. परिणामी डोंबिवली (Dombivli) कल्याण (Kalyan) या स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. सीएसएमटी कडे जाणाऱ्या लोकल या तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. संबधित तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी आता मध्य रेल्वेचे कर्मचारी प्रयत्न करत असून काहीच वेळात स्थिती पुर्वव्रत होईल असा विश्वास दर्शवण्यात येत आहे.
यापूर्वी रविवारी सुद्धा कल्याण ते खडवली दरम्यान रुळाला तडा गेला होता, याला आता एवढे तीन न दिवस न उलटताच आज पुन्हा मध्य रेल्वे विलंबाने धावत असल्याने प्रवासी संतप्त आहेत. कल्याण-खडवली स्थानकात रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
दर रविवारी मध्य रेल्वे सहित लोकलच्या सर्व मार्गांवर मेगाब्लॉक घेऊन रुळाच्या डागडुजी सहित अन्य तांत्रिक कामे केली जातात, मात्र तरीही आठवडा सुरु होतो ना होताच लगेचच अशा प्रकारची विस्कळीत सेवा पाहून प्रवाशांना मनस्ताप झाला आहे.