Photo Credit- X

NMMT Bus Caught Fire in Navi Mumbai: कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला (Navi Mumbai Bus) गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता अचानक आग लागली. आग लागताच सर्व प्रवासी उतरल्याने जीवितहानी टळली. त्यानंतर गस्तीवर असलेले कोळसेवाडी शाखेचे वाहतूक पोलिस तातडीने पोहोचले. सध्या आग (Sudden Fire in Navi Mumbai Bus)विझवण्यात आली असून आगीचे कारण तपासले जात आहे.

बसला आग लागताच रस्त्याच्या दुतर्फाची वाहतूक वाहतूक पोलिसांनी रोखून धरली. त्यामुळे सकाळी काही वेळ शिळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. चालकाने तत्परतेने प्रवाशांना बसमधून उतरण्याचे आवाहन केले. ते स्वता बसमधून उडी मारून बाजुला झाले. बसला आग लागताच गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी पहिले इतर अनर्थकारी घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजुची वाहतूक रोखून धरली. तातडीने एक टँकर घटनास्थळी बोलावून घेतला. त्यानंतर आग विझविण्यात आली.

नवी मुंबई परिवहन सेवेच्या इलेक्ट्रीक बसला आग

बसची आग अर्धा तासात विझवल्यावर क्रेन घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी बोलवली. या क्रेनच्या साहाय्याने आगीत जळून खाक झालेली बस रस्त्याच्या बाजुला घेऊन या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली.