Nashik: रिल्ससाठी व्हिडिओ शुट करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी थेट मोटरमॅनच्या केबिनमध्ये प्रवेश केला. कसारा रेल्वे स्थानकावर थांबलेल्या लोकल ट्रेनच्या मोटरमॅनच्या केबिनमध्ये दोन तरुणांनी घुसखोरी केली. या घटनेनंतर रेल्वे संरक्षण दलाने दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना 25 जुलै रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (हेही वाचा- रविवारी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; बाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक आणि इतर तपशील पहा)

मिळालेल्या माहितीनुसार, राजा हिम्मत येरवाल (20) आणि रितेश हिरालाल जाधव (18) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. कसारा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 4 वर उभ्या असलेल्या उपनगरिय ट्रेन क्रमांक 95410 च्या मोटरमॅनच्या केबिनमध्ये एकाने प्रवेश केला आणि त्यानंतर दुसऱ्या आरोपीने व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला.

घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेलच्या सहकार्याने या दोघांना 8 ऑगस्ट रोजी नाशिक येथून अटक केले. चौकशीदरम्यान, आरोपींनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ तयार करण्यासाठी ट्रेनच्या मोटरमॅनच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याचे चौकशीत कबुली दिली. त्यांनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केले. CR NO.1200/24, कलम 145(b) आणि 147 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला.