Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
ताज्या बातम्या
34 minutes ago

UP Goods Train Derailed: सहारनपूर, यूपीमध्ये रेल्वे अपघात! मालगाडीचे 2 डबे रुळावरून घसरले, कोणतीही जीवितहानी नाही

देशात पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. सहारनपूर, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकाजवळ धान्य वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण धान्य रुळांवर विखुरले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या रेल्वे रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी पंजाबमधील गुरुहरसहे येथून बाम्हेरीकडे जात होती.

राष्ट्रीय Shreya Varke | Oct 25, 2024 01:28 PM IST
A+
A-
(Photo Credits ANI)

UP Goods Train Derailed: देशात पुन्हा एकदा रेल्वे अपघात झाला आहे. सहारनपूर, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकाजवळ धान्य वाहतूक करणाऱ्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. त्यामुळे संपूर्ण धान्य रुळांवर विखुरले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या रेल्वे रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी पंजाबमधील गुरुहरसहे येथून बाम्हेरीकडे जात होती. सहारनपूर येथील रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे अचानक रुळावरून घसरले. यानंतर गदारोळ निर्माण झाला होता.

यूपीमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले.

अपघाताची चौकशी सुरू

घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल. अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Show Full Article Share Now