निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण: फाशी रद्द करण्याच्या मागणीसाठी  दोषी विनय कुमार सर्वोच्च न्यायालयात
The Supreme Court of India | File Image | (Photo Credits: PTI)

निर्भया बलात्कार प्रकरणी चारही आरोपींना दिल्लीच्या पटियाला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यापैकी एक दोषी विनय कुमार (Vinay Kumar Sharma) याने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. फाशीची शिक्षा रद्द करावी या मागणीसाठी विनय कडून सर्वोच्च न्यायलयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणी चारही दोषींना येत्या 22 जानेवारी दिवशी सकाळी 7 वाजता फाशी दिली जाणार आहे.Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी.

विनय कुमार कडून करण्यात आलेल्या दाव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये 17 अन्य प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा ही आजीवन कारावासामध्ये बदलण्यात आली आहे. ज्यामध्ये अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. त्याप्रमाणेच विनयला देखील सूट देण्यात यावी व त्याची फाशी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ANI Tweet  

निर्भया बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशी देण्यासाठी तिहार जेलमध्ये तयारी सुरू करण्यात आली आहे. तिहार तुरूंग प्रशासनाकडून उत्तर प्रदेशातील फाशी देण्यासाठी जल्लादांना बोलावण्यात आले आहे.