Nirbhaya Case: आरोपींच्या विरोधात डेथ वॉरंट जारी, 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता होणार फाशी
निर्भया सामूहिक बलात्कार आरोपी (Photo Credits-File Image)

देशाची राजधानी दिल्ली येथे 2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी मंगळवारी पटियाला हाऊस कोर्ट येथे सुनावणी झाली. तर आज कोर्टाने अंतिम निर्णय सुनावला असून 22जानेवारी सकाली 7 वाजता आरोपींना शिक्षा दिली जाणार आहे.  तर या प्रकरणी आता पर्यंत दाखल करण्यात आलेल्या  याचिका फेटाळून लावण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभराच्या दरम्यान सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने एका आरोपीबाबत दाखल केलेली याचिका सुद्धा फेटाळून लावली. निर्भयाच्या प्रकरणी आरोपी मुकेश, वियन, पवन आणि अक्षय यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान एकाने तिहार जेलमध्ये आत्महत्या करून आपले जीवन संपवले. पण आता डेथ वॉरंट जारी होण्याच्या निर्णय घेण्यात आला.

पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया प्रकरणी सुनावलेल्या निर्णयावर तिची आई आशा देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, माझ्या मुलीला न्याय मिळाला आहे. 4 दोषींना फाशी देण्यात आल्यामुळे देशातील महिला सशक्त होतील. या निर्णयामुळे न्यायालयीन यंत्रणेवरील लोकांचा विश्वास बळकट होईल.(Nirbhaya Case:'पोक्सोअंतर्गत दोषींना दया नकोच'- राष्ट्रपती रामनाथ कोविंद)

ANI Tweet: 

ANI Tweet: 

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी हत्येच्या तब्बल 7 वर्षांनंतर निर्भया प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारीला फाशी  देण्यात येणार आहे.  या चार आरोपींना फाशी देण्यापूर्वी एका डमीला फाशी देण्यात आली. आरोपींना जेल क्रमांक 3 मध्ये फाशी दिली जाण्याची शक्यता आहे. इथेच आतंकवादी अफजल गुरूला फाशी देण्यात आली होती. दरम्यान, फाशी देण्यासाठी जल्लादची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे  होते. 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करुन तिला पूर्णपणे खजमी करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपीला अटक केली होती. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी सिंगापूर येथील माउन्ट एलिझाबेथ रुग्णालयात निर्भयाने अखेरचा श्वास घेतला होता.