US-Iran Tensions: पेट्रोल, डिझेलचे भाव भडकले; जाणून घ्या मुंबई शहरातील आजचा दर काय?
Petrol - Diesel Price In Mumbai | Image Use For Representational Purpose | File Photo

Mumbai Petrol-Diesel Price On January 9:  अमेरिका (USA) आणि इराणमधील (Iran) तणावग्रस्त संबंधांचा परिणाम आता जगभरात उमटायला सुरूवात झाली आहे. मागील आठवड्याभरापासून पेटलेल्या संघर्षामुळे आता जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वधारले आहेत. आज (9 जानेवारी) मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर 81 रूपये 40 पैसे आहे. तर डिझेलचा दर 72 रूपये 79 पैसे इतका आहे. पेट्रोल, डिझेलच्या दराच्या किंमतीमधील भडक्याप्रमाणेच आता खाद्य तेलाचे दर देखील वधारले आहेत. कच्च तेल देखील 1.49 % ने वधारलं असून प्रति बॅरल त्याची किंमत 4561 वर पोहचली आहे. US-Iran Conflict: इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला

दरम्यान तेल कंपन्यांमध्ये IOC, BPCL आणि HPCL च्या पेट्रोल, डीझेलच्या दरामध्ये सतत चढ-उतार होत असतो. दरम्यान दिवसभरासाठी नवा दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू केला जातो. या किंमतींमध्ये एक्साईज ड्युटी, डिलर कमिशन यांचं गणित करून किंमती जाहीर केल्या जातात.

एक दिवस भाव स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारायला सुरूवात झाली आहे. दिल्ली, मुंबईमध्ये पेट्रोल 7 पैशाने वाढले आहे. तर डीझेलचे दर मुंबई शहरामध्ये 15 पैशांनी वाढले आहे. दरम्यान सीएए आणि कश्मीर प्रश्नावरून घेतलेल्या भूमिकेमुळे भारताने पाम तेलाच्या आयीतवरही बंदी घातली त्यामुळे देशात पामतेलाचे भाव देखील वाढले आहेत. मुंबईत पामतेलाच्या किंमती 100 च्या पार गेल्या आहेत.