Dussehra Shastra Puja (Photo Credits-Twitter)

अश्विन महिन्यातील शुल्क पक्षाच्या दशमी तिथीला विजयादशमी (Vijayadashami) साजरी केली जाते. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा मनोभावे करण्यात येते. तसेच देवी पूजेवेळी सोने-शस्रांची पूजा केली जाते. शस्रांची पूजा करणे ही परंपरा रामायण आणि महाभारतापासून सुरु झाली आहे. याच दिवसाचे औचित्य साधत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आज फ्रान्स मध्ये लढाऊ विमान राफेलसह अन्य शस्रांची पूजा करणार आहेत. तसेच आजच्या दिवशी वायुसेना दिवस सुद्धा साजरा करण्यात येत आहे.

दसऱ्याच्या दिवशी शस्रांची पूजा करण्याची परंपरा आजच नाही तर प्राचीन काळापासून चालत आली आहे. प्राचीन काळात राजेमहाराजे शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी शस्रांची पूजा करत असत. त्याचसोबत शत्रूंसोबत लढण्यासाठी कोणती शस्रात्रे वापरण्यात यावी याबाबत ही निर्णय घेत असत.

तसेच भारतीय सेना प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शस्रांची पूजा करतात. या पूजेत सर्वात प्रथम देवी दुर्गा मातेची दोन रुपे जया आणि विजया यांची पूजा केली जाते. या पुजेचे मुख्य उद्दिष्ट सीमेचे संरक्षण करण्यासाठी देवी मातेचा आशिवार्द मिळवणे होय. मान्यतांनुसार रामयणापासूनच शस्रांची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली आहे. भागवान राम यांनी रावणासोबत युद्ध करण्यापूर्वी शस्रांची पूजा केली होती.(राफेल निमित्ताने फ्रान्समध्येही साजरा होणार दसरा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह करणार शस्त्र पूजन)

कशी केली जाते शस्रांची पूजा?

शस्र पूजा करण्यासाठी प्रथम सर्व शस्रे एकत्र करतात. त्यानंतर त्यावल गंगाजल छिंपडण्यात येते. तसेच शस्रांना हळद-कुंकू आणि फुले वाहिली जातात. शस्र पूजा करताना आपट्याच्या पानांचे फार महत्व आहे. तर शस्र पूजा करताना लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पुजा केली जाते.