Viral Video: नोएडामध्ये कुत्र्या चावण्याच्या घटना सतत चर्चेचा विषय बनत आहेत. शहरात ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून, लोकांमध्ये चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, ग्रेटर नोएडा येथील एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याला नेण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाला महिलेने मारहाण केली. यानंतर या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी गौर सिटी 2 मधील अव्हेन्यू सोसायटीमध्ये घडली. पोलिस उपायुक्त शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवर कारवाई करण्यात आली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अल्पवयीन मुलगा एका महिलेला तिच्या कुत्र्यासह लिफ्टमध्ये येणार नकार देत होता. यामुळे महिला संतापली आणि तिने मुलाला लिफ्टमधून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लिफ्टमध्ये कुत्रा आणण्यास नकार दिल्याने महिलेची अल्पवयीन मुलाला मारहाण - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)