
Best Luck Messages For SSC Exam: दहावीच्या बोर्ड परीक्षा (SSC Board Exam) शुक्रवारपासून सुरु होणार आहेत. यासाठी सर्व परीक्षा केंद्रांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून आता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (SSC Exam 2025) उद्यापासून सुरू होणार आहे.
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरची पहिली पायरी असते, असं म्हटलं तरी चूकीचं ठरणार नाही. कारण, दहावीच्या गुणांवर त्याचा पुढील प्रवेश निश्चित केला जातो. त्यामुळे जेव्हा बोर्ड परीक्षांचा निकाल लागतो, तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांत किंवा शेजारी राहणाऱ्या विद्यार्थांना किती गुण पडले? याची चौकशी करतो. त्यामुळे त्यांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी शुभेच्छा देणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खास Messages, Wishes, Quotes द्वारे शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटिंग्ज घेऊन आलो आहोत. तुम्ही या शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढवू शकता.
दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा -
खूप शिका आणि मोठे व्हा.
सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक परीक्षेसाठी शुभेच्छा!

10 वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा!
Best of Luck!

दहावीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Best of Luck

या परीक्षेत तुला उत्तम यश प्राप्त व्हावे याच सदिच्छा.
Best of Luck

परीक्षा आहे म्हणून भांबावून जाऊ नकोस.
उत्तम तयारी झाली आहे, त्यामुळे यश मिळेलच.
Best of Luck

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा उद्या म्हणजेचं 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 16,11,610 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये 8,64,120 मुलांचा आणि 7,47,471 मुलींचा समावेश असून 19 तृतीयपंथीचा समावेश आहे.