
Chhaava Declared Tax Free In Goa: मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) आता विकी कौशल (Vicky Kaushal) चा 'छावा' (Chhaava) हा चित्रपट गोव्यातही (Goa) करमुक्त (Tax Free) करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त बुधवारी संध्याकाळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे यासंदर्भात घोषणा केली. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट त्यांच्या राज्यात करमुक्त केला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आतापर्यंतच्या कमाईवर नजर टाकली तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट सुपरहिट ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, 'छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित 'छावा' हा चित्रपट गोव्यात करमुक्त केला जाईल हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.' त्यांनी यावर भर दिला की, हा चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो, ज्यांनी 'देव, देश आणि धर्म' साठी मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला. (हेही वाचा - Chhaava Box Office Collection Day 5: 'छावा'ने प्रेक्षकांची मने जिंकली; पाच दिवसांत 171.28 कोटींची अधिकची कमाई)
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'छावा' चित्रपट करमुक्त करण्याच्या आवाहनाचे स्वागत केले आहे. त्यांनी चित्रपटाच्या ऐतिहासिक सादरीकरणाचे कौतुक करताना सांगितले की, त्यांना लोकांकडून चित्रपटाबद्दल चांगला प्रतिसाद मिळाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर एक अतिशय चांगला चित्रपट बनला आहे याचा मला आनंद आहे. मी अद्याप हा चित्रपट पाहिला नाही. परंतु मला मिळालेल्या अभिप्रायावरून असे दिसून येते की या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केलेले नाही. यासोबतच फडणवीस यांनी असेही सांगितले की, महाराष्ट्राने 2017 मध्ये मनोरंजन कर आधीच रद्द केला होता. ('किल्ले रायगडावर जातोय', Shiv Jayanti निमित्त Vicky Kaushal ची घोषणा; म्हणाला, “19 फेब्रुवारीला आपल दैवत…”)
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा ओलांडला आहे. आता लवकरच तो 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवरून 197.75 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.
'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. याशिवाय, रश्मिका मंदान्ना यांनी येसूबाई भोसलेची भूमिका साकारली आहे. तथापी, अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे, डायना पेंटीने झीनत-उन-निसा बेगमची भूमिका साकारली आहे. तसेच दिव्या दत्ताने सोयराबाईची भूमिका साकारली आहे.