Murder प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Nashik Shocker: राज्यात अलिकडच्या काळात अनेक जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भरदिवसा गुन्हेगारी घटना घडून आणल्या जात आहेत. दरम्यान, सध्या नाशिक जिल्ह्यामधून (Nashik District) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकरोडजवळील नवले कॉलनी परिसरात एका 24 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. अजय भंडारी असे मृताचे नाव असून रात्री उशिरा त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच अद्याप हल्ल्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. तथापी, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक गिरी आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. ही हत्या कोणी आणि का केली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - (हेही वाचा: Santosh Deshmukh Murder Case: 'या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मी राजीनामा का द्यावा?'; Minister Dhananjay Munde यांचा सवाल)

दरम्यान, या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत असून त्याचे विश्लेषण करत आहेत. याशिवाय, पोलिस परिसरातील लोकांची देखील चौकशी करत आहेत. ही हत्या करण्यामागे आरोपीचा उद्देश नेमका काय होता? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. (वाचा - Murder: लग्नासाठी आलेल्या मुली आजी वारंवार नाकारत होती, संतापलेल्या नातवाने केली हत्या)

पोलिसांनी अजय भंडारी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिस या घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. या हत्येच्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली असून परिसरातील नागरिक आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.