Naxalites strangled 2 people to death प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - ANI)

Dantewada: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील दंतेवाडा जिल्ह्यात (Dantewada District) नक्षलवाद्यांनी (Naxalites) पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून दोन जणांची हत्या (Murder) केली. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नक्षलवाद्यांच्या एका गटाने तोडामा गावात स्थानिक शिक्षक बमन कश्यप आणि ग्रामस्थ अनीस राम पोयम यांची गळा दाबून हत्या केली. बुधवारी रात्री नक्षलवाद्यांच्या एका गटाने दंतेवाडा-विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील तोडमा गावात पोहोचून प्राथमिक शाळेतील शिक्षक बमन कश्यप (वय,29) आणि अनीस राम पोयम (वय, 38) यांना जंगलात नेले. नंतर नक्षलवाद्यांनी दोघांचीही गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह गावाजवळ फेकून दिले.

या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी अलिकडेच अशाच अनेक घटनांमध्ये पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांना लक्ष्य केलं आहे. (हेही वाचा -Nashik Shocker: नाशिक शहर हादरलं! नवले कॉलनीत 24 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून निघृण हत्या)

यापूर्वी 4 फेब्रुवारी रोजी नक्षलवाद्यांनी पोलिस खबरी असल्याच्या आरोपाखाली एका 30 वर्षीय व्यक्तीची हत्या केली होती. तसेच 3 फेब्रुवारी रोजी, विजापूर जिल्ह्यात दोन जणांची हत्या करण्यात आली होती. तथापी, 26 जानेवारी रोजी भैरमगड परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आणि त्याच्यावर सीपीआय (माओवादी) बद्दल माहिती दिल्याचा आरोप होता. (वाचा - Murder: लग्नासाठी आलेल्या मुली आजी वारंवार नाकारत होती, संतापलेल्या नातवाने केली हत्या)

दरम्यान, गेल्या वर्षी बस्तर भागात नक्षलवादी हिंसाचारात 68 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दंतेवाडासह 7 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी अशा घटनांची एक मोठी मालिका घडवून आणली आहे. तथापी, काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील विजापूरमध्ये भारतीय जवानांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते.