चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने या स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत बांगलादेशने भारतासमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 4 विकेट गमावून 46.3 षटकात विजय मिळवला.
...