Defence Minister Rajnath Singh. (Photo Credits: Twitter)

Dussehra celebration in France: देशभरात चर्चेचा विषय ठरलेले राफेल विमान (Rafale Aircraft) अखेर भारतात दाखल होणार आहे. हे विमान फ्रान्सकडून स्वीकारत भारतात दाखल करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) फ्रान्सला (France) रवाना झाले आहेत. फ्रान्समधील पॅरीस येथे ते राफेल विमान शस्त्र पूजन करतील. दसरा सणानिमित्त शस्त्रपूजा करण्याची मोठी परंपरा भारतात आहे. परंतू, राफेल विमान शस्त्रपूजनाच्या निमित्ताने फ्रान्स देशात बहुदा पहिल्यांदाच भारतीय संरक्षणमंत्री दसरा साजरा करत आहे. अर्थात दसरा हा सण भारतात मोठ्या प्रमाणवर सारजा केला जात असला आणि भारतीय संस्कृतीचे तो प्रतिक असला तरी, जगभरातील इतर देशांमध्येही हा सण साजरा केला जातो. भारतासोबत श्रीलंका , नेपाल , माँरिशस, मलेशिया, इंडोनेशिया,चीन या देशांमध्ये दसरा सण साजरा केला जातो.

दरम्यान, राजनाथ सिंह हे तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते 'डिफेंस डायलॉग' या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होतील. तसेच, राफेल विमान स्वीकारण्याच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असेन. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण या दौऱ्यात प्रयत्नशील राहू' असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

विजयादशमी आणि भारतीय वायूदल स्थापना दिवस असे दुहेरी औचित्य साधत राफेल विमान आज भारताकडे सुपूर्त होत आहे. यथासांगपणे शस्त्रपूजा केल्यानंतर राफेल विमान भारताच्या दिशेने हवेत झेपावणार आहे. दरम्यान, या दौऱ्यात राजसनाथ सिंह पहिल्यांता पॅरीस येथे फ्रान्सचे राष्ट्रपती एमैनुएल मैक्रों यांची भेट घेणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमध्ये सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. फ्रान्सकडून एकूण 36 विमाने भारताला मिळणार आहेत. त्यातील पहिले विमान आज भारताकडे सुपूर्त होत आहे. (हेही वाचा,  राफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार)

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2019 मध्ये राफेल विमान हा राजकीय चर्चेचा मोठा विषय ठरला होता. राफेल विमान खरेदी व्यवाहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि तत्कालीन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. तर, राफेल विमान देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सांगत विरोधकांच्या आरोपाल सत्ताधारी एनीडए सरकारने प्रत्युत्तर दिले होते. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी राफेल खरेदी मुद्द्यावरुन घमासान पाहायला मिळाले होते.