mage of Rafale fighter jet used for representational purpose | (Photo credits: www.dassault-aviation.com)

फ्रन्सची विमान कंपनी दसॉल्ट एव्हिएशन (Dassault Aviation) आपले जगप्रसिद्ध आणि अद्ययावत फायटर जेट (Fighter Jet) राफेल रिप्लेस करणार आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानापेक्षाही अद्ययावत सुविधा आणि तंत्रज्ञानाने युक्त अशा फायटर विमानाची निर्मिती करणार आहे. या विमानाच्या निर्मितीसाठी कंपनीने एयरबस (Airbus) सोबत हातमिळवणी केली आहे.

दसॉल्टचे हे नवे आणि अद्ययावत विमान जर्मनीच्या युरोफायटर या लढावू वमानाची जागा घेईन. दसॉल्ट एव्हिएशन आणि एअरबस यांची संयुक्त निर्मिती असलेले हे विमान साधारण 2040 पर्यंत अवकाशात उड्डाण घेऊ शकते. या प्रकल्पाबाबत फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन आदी देशांनी पॅरीस एअरशो दरम्यान त्रिपक्षीय समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या. या समझोत्यामागे फअरान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली.

फ्रान्स आणी जर्मनी या दोन्ही देशांनी 2026 पर्यंत या लढाऊ विमानाचा प्रोटोटाइप (नमूना) सादर कण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यक्रमांतर्गत फ्रान्स आणि जर्मनी सरकारकडून 4.5 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. फ्रान्सच्या संरक्षण विभागाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सकडून यात 2.5 अब्ज युरो इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)

फ्रान्स सरकारचे सॅफरन आणि जर्मनीचे एमटीयू एयरो इंजिन्स मिळून एक नवे युद्ध विमान इंजिन बनवले जाणार आहे. जर्मन संरक्षणमंत्री उर्सूला वोन जर लेयेन यांनी म्हटले आहे की, फ्रोजेक्ट युरोपीय डिफेन्स इंडस्ट्रीजला मजबूत करेन. सोबतच ही कंपनी नवे अत्याधुनिक संशोधन करण्यास संधीही उपलब्ध करुन देईन.