Paper Leak प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Jharkhand Paper Leak: झारखंड शैक्षणिक परिषदेने (Jharkhand Academic Council) गुरुवारी दहावीच्या बोर्ड परीक्षेतील (10th Board Exams)  हिंदी आणि विज्ञान विषय रद्द करण्याची घोषणा केली. या विषयांचे पेपर्स सोशल मीडियावर लीक (Paper Leak) झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जेएसीने गुरुवारी एक नोटीस जारी करून पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. 2025 च्या झारखंड बोर्डाच्या या पुनर्परीक्षेच्या तारखा योग्य वेळी जाहीर केल्या जातील. विद्यार्थी आणि पालकांना अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा आणि अधिक माहितीसाठी संबंधित शाळा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला जेएसीने दिला आहे. (हेही वाचा :HSC Exam Paper Leak: इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक )

हिंदी आणि विज्ञानाचा पेपर रद्द -

झारखंड अकादमिक परिषदेने यासंदर्भात जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे, 18 फेब्रुवारी रोजी होणारी हिंदी (कोर्स अ आणि कोर्स ब) परीक्षा आणि 20 फेब्रुवारी रोजी होणारी विज्ञान परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या दोन्ही विषयांची पुनर्परीक्षा नंतर घेतली जाईल. (हेही वाचा -HSC Paper Leak : परभणीत बारावीचा बायोलॉजी पेपर फुटला; प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

झारखंडमध्ये 11 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या परीक्षा -

झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 11फेब्रुवारीपासून सुरू झाल्या होत्या. परीक्षेसाठी राज्यभर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. झारखंडमध्ये यावर्षी सुमारे 7.84 लाख विद्यार्थी या बोर्ड परीक्षांना बसले आहेत. दहावीची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये (सकाळी 9.45 ते दुपारी 1) घेतली जात आहे, तर बारावीची परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये (दुपारी 2 ते सायंकाळी 5.15) घेतली जात आहे.