Photo Credit - Pexels

HSC Paper Leak : राज्यात बारावीचे बोर्डाचे पेपर सुरू आहेत. बारावीचे पेपर फुटू नयेत यासाठी परिक्षा केंद्रावर पोलीस तैनात केलेले असतात. मात्र, तरीही बारावीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर काही काळ खळबळ उडाली होती. त्यामुळे परिक्षा काळात गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नानांना हरताळ फासल्याचे दिसत आहेत. परिणामी काही विद्यार्थ्यांसह पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (हेही वाचा : Maharashtra Board HSC Math's Question Paper Leak: बारावी गणित पेपरफुटीप्रकरणाचा तपास ‘SIT’ कडे )

काही दिवसांपूर्वी राज्यात स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना घडली होती. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याने उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाच्या पेपर विषयी झाला आहे. परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. बोर्डाच्या प्रचंड खबरदारीनंतरही परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये फुटल्याने प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (हेही वाचा :HSC Exam Paper Leak: इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत पेपरफुटी, मुंबई पोलिसांकडून मालाड येथील खासगी क्लासमधील शिक्षकास अटक )

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पेपर हा बोर्डाच्या परीक्षेचाच पेपर असल्याचा दावा केला जात आहे. पेपर फुटल्याने बोर्डाने नावालाच खबरदारी घेतली होती का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. आता पेपरफुटी रोखणे बोर्डापुढे मोठे आव्हान असणार आहे.