Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटी (HSC Exam Paper Leak) झाल्याची घटना पुढे येत आहे. इयत्ता बारावीचा रसायनशास्त्र (Chemistry) विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मालाड (Malad) येथील एका खासगी कोचिक क्लासेसच्या शिक्षकास अटक केली आहे. या शिक्षकाने इयत्ता बारीवी बोर्ड परीक्षेचा पेपर आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्यात पाठीमागील काही काळापासून पेपरफुटीची बरीच प्रकरणे पुढे आली आहेत. ही प्रकरणे नोकरभरती संबंधित होती. मात्र, आता त्या श्रृंखलेत बोर्ड परीक्षाही आल्या आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

मुकेश यादव असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेपूर्वीच पेपर या शिक्षकाच्या मोबाईल वर आला होता. हा पेपर या शिक्षकाने आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. क्लासमध्ये शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविण्यात आला. केमेस्टी (रसायनशास्त्र) या विषयाचा पेपर शनिवारी झाला. मात्र, तत्पूर्वीच या शिक्षकाने हा पेपर फोडल्याचे पुढे आले आहे. (हेही वाचा, Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्‍या मुख्याध्यापकांना सरकारचा दणका; तालुकास्तरावर केंद्रप्रमुखाकडून हॉल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था - मंत्री बच्चू कडू यांची माहिती)

ट्विट

दरम्यान, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS Exam) हिवाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेतरही एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक म्हणजे नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत जो पेपर होता जसाच्या तसा हाच पेपर याही परीक्षेत आला होता. महाविद्यालयातील ज्या प्राध्यापकांवर हा पेपर तयार करण्याची जबाबदारी होती त्यांच्याकडूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.