Maharashtra Board HSC, SSC हॉलतिकीटसाठी अडवणूक करणार्या मुख्याध्यापकांना राज्य सरकारने दणका दिला आहे. फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण मुख्यध्यापकांचे हे वागणं चूकीचे आहे त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. तसेच विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर केंद्रप्रमुखाकडून हॉल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दहावी, बारावी परीक्षाचे हॉल तिकीट मुख्याध्यापकांनी अडविण्याचे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याकरीता तालुकास्तरावरील केंद्रप्रमुख/गटशिक्षणाधिकारी मार्फत हॉल तिकीट मिळविण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)