Strike प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - pixabay)

Nurse Strike In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati  Sambhajinagar) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (Government Medical College and Hospital) परिचारिकांनी (Nurse) रिक्त पदे भरण्यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी एक दिवसाचा संप (Strike) पुकारला. संपावर असलेल्या परिचारिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयांमधील सामान्य कामकाज प्रभावित झाल्याचा दावा केला, तर वैद्यकीय सुविधांमधील अधिकाऱ्यांनी निषेधाचा फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्र शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा इंदुमती थोरात यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी 15 दिवसांपूर्वी राज्य अधिकाऱ्यांना संपावर जाण्याच्या योजनेची माहिती दिली होती. थोरात यांनी म्हटलं आहे की, आम्हाला या समस्या सोडवण्यासाठी सरकारशी चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इंदुमती थोरात यांनी दावा केला की, राज्यभरात 8 हजार ते 10 हजार परिचारिका संपावर आहेत. (हेही वाचा - Chhatrapati Sambhaji Maharaj's Samadhi: पुणे जिल्ह्यातील 'तुळापूर' आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ, तर वढू बुद्रुक समाधीस्थळ; जाणून घ्या या दोन्ही ठिकाणांबद्दल)

सरकारकडून मागण्यांची दखल घेण्यास टाळाटाळ - इंदुमती थोरात

इंदुमती थोरात यांनी सांगितलं की, आता आम्हाला समजले आहे की सरकार गेल्या 18 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परिचारिकांच्या मागण्यांची दखल घेण्यास टाळाटाळ करत आहे. रिक्त पदे भरण्याबरोबरच, परिचारिकांनी ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांना बढती देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई राज्यसरकारी परिचारिका संघटनेच्या सहसचिव छाया गायकवाड यांनी सांगितले की, नर्सिंग केडरमध्ये प्रलंबित पदोन्नतीच्या मागणीसाठी हा एक दिवसाचा संप आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांनी या संपात सहभाग घेतला होता. तसेच जेजे हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल आणि जीटी हॉस्पिटलमधील परिचारिकांनी देखील संपात सहभाग घेतला.