
आज देशभरात ठिकठिकाणी दसऱ्याच्या(Dussehra 2019) निमित्ताने रावण दहनाचा (Ravan Dahan) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुराणकथेनुसार या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून सीतेला परत आणले होते, या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दरवर्षी दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashmi) साजरी केली जाते. यानिमित्ताने भारतात रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. चंदीगड (Chandigarh) मधील धनास मैदानात सुद्धा अशाच प्रकारे आज एका रावणरुपी पुतळ्याचे दहन केले जाणार आहे. पण हा पुतळा काही साधासुधा नाही. या पुतळ्याची उंची 221 फूट इतकी असून हा जगातील सर्वात उंच पुतळा म्ह्णून सांगण्यात येत आहे. आज,
पण तत्पूर्वी चला तर पाहुयात या एवढ्या खास रावण पुतळ्याची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत?
- हा पुतळा 221 फूट उंच असून अडीच लाख चौरस किलिमीटर परिसरात उभारण्यात आला आहे.
- हा पुतळा कोसळण्याची किंवा त्याला गळती लागण्याची शक्यता नगण्य आहे
-जवळपास 70 ते 100 किमी प्रतितास वेगाने येणाऱ्या वाऱ्याचा सामना हा पुतळा सहजतः करू शकेल.
- अगदी रामायणात जश्या प्रकारे रावणाचे वर्णन केले आहे त्याच धाटणीची या पुतळ्याची बांधणी आहे.
-तुम्ही कुठूनही या पुतळ्याकडे पाहिलेत तरी तो तुमच्याकडेच पाहतोय असे भासून येते.
दरम्यान, बराडा, अंबाली येथील रहिवाशी राणा तेजिंदर सिंह चौहान यांना हा पुतळा साकारला आहे. या पुतळ्याच्या रक्षणासाठी याठिकाणी 40 सुरक्षारक्षक तैनात होते .तूर्तास या पुतळ्याच्या आसपास जाण्यास सर्वांना बंदी घालण्यात आली असून, आज म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी तब्बल 250 रक्षकांच्या उपस्थितीत. साधारण 800 फुटांवरून रिमोटच्या मदतीने हा पुतळा जाळला जाणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.