Delmicron भारतामध्ये आहे का? Health Experts ने विनाकारण चिंता न करता  Omicron शी सामना करण्यासाठी सतर्क राहण्याचं केलं आवाहन
(Photo Credit - Pixabay)

ओमिक्रॉनचा जगभर सुरू असलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर आता भारतामध्ये डेल्मिक्रॉन म्हणजेच डेल्टा आणि ओमिक्रॉन यांचा मिलाफ असलेला नवा व्हेरिएंट आल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान आज (25 डिसेंबर) हेल्थ एक्सपर्टनी अशा अफवांना विनाकारण पसरवू नका असं आवाहन करताना याबाबत जागतिक आरोग्य संघटना किंवा अमेरिकेच्या सीडीसी ला काही अधिकृतपणे बोलू द्या असं म्हटलं आहे.

भारतामध्ये आता डेल्मिक्रॉनची चर्चा वाढत आहे. एका रिपोर्ट मध्ये महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. शशांक जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपात, अमेरिकेमध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन यांचे ट्वीन स्पाईक असलेल्या व्हेरिएंट मुळे रूग्णसंख्येचा स्फोट झाला आहे.

सध्या कुठेही ऑमिक्रॉननंतर SARS-CoV-2 virus मध्ये म्युटेशन झाल्याची माहिती नाही. भारतामध्ये सुद्धा आयसीएमआर किंवा भारताच्या कोविड टास्क फोर्स कडून देखील याबाबत कोणताही दुजोरा किंवा माहिती देण्यात आलेली नाही. नक्की वाचा: Coronavirus: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून .

दिल्ली एम्सच्या Centre for Community Medicine चे असोसिएट प्रोफेसर हर्षल सालवे यांनी आयएएनएस ला दिलेल्या माहितीनुसार, डेल्मिक्रॉन असा व्हेरिएंट नाही. ओमिक्रॉन देखील नवा वायरस नव्हे तर तो कोरोना वायरस मधील म्युटेशन आहे. आतापर्यंतच्या अभ्यासामध्येही या वायरस मुळे संसर्ग वेगाने पसरत असला तरीही लक्षणं सौम्य असल्याचेच समोर आले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही.

भारतामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 415 नवे ओमिक्रॉनची लागण झालेले एकूण रूग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 108 रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 79 आहेत. गुजरात मध्ये 43 तर तेलंगणामध्ये 38 रूग्ण आहेत.

मेदांता हॉस्पिटलच्या Infectious Diseases Specialist डॉ. नेहा गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारतात अजूनही डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त प्रभावी आहे. ओमिक्रॉन आता हळूहळू समोर येत आहे.

डेल्टाचा incubation period हा 2 ते 28 दिवस होता. त्या तुलनेत ओमिक्रॉन चा incubation period अवघा 3 दिवसांचा आहे. त्यामुळे भारतात तिसरी लाट आली तर ती लहान कालावधीची असेल आणि योग्य काळजी न घेतल्यास लवकर पीक वर जाऊ शकते. डेल्मिक्रॉन बद्दलही विनाकारण चिंता करण्याची गरज नसल्याचही त्या म्हणाल्या आहेत'.