वीरप्पन मुलगी विद्या राणी (Photo Credits-ANI)

कुख्यात चंदन तस्करी करणााऱ्या वीरप्पन (Veerappan) याची मुलगी विद्या राणी (Vidya Rani) हिने नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यावेळी भाजप नेते मुरलीधर राव, पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत विद्या राणी यांनी कृष्णनगरीत पार पाडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. तर पक्षात प्रवेश करत कोणाचीही जात किंवा धर्म न पाहता आणि मागासवर्गीय लोकांसाठी काम करण्याची इच्छा विद्या राणी हिने व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या काही योजना सरकारपर्यंत पोहचवणार असल्याचे ही तिने म्हटले आहे.

विद्या राणी हिने भाजपत प्रवेश केल्यानंतर असे म्हटले आहे की, माझ्या वडिलांनी निवडलेला मार्ग चुकीचा होता. परंतु त्यांनी गरिबांचा विचार केला होता. मात्र आता भाजप प्रवेश करत तिने ही गरिबांसाठी काम करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. वीरप्पन यांना दोन मुली असून विद्या राणी आणि प्रभा नावाच्या अशा दोन मुली आहेत. त्यापैकी विद्या ही मोठी मुलगी असून ती पेशाने वकील आहे.(वारीस पठाण यांनी मागे घेतले 15 कोटी मुस्लिम 100 कोटींवर भारी पडतील हे वादग्रस्त विधान; सर्व धर्माचा आदर करतो म्हणत व्यक्त केली दिलगिरी)

दरम्यान वीरप्पन हा कुख्यात चंदन तस्करी प्रकरणी ओळखला जायचा. त्याचा दबदबा कर्नाटक आणि तमिळनाडू येथे होता. दक्षिण भारतातील जंगले वीरप्पन याच्या हातात होती. जंगलात बसून वीरप्पन हत्तीचे दात आणि चंदनाची खुलेआम तस्करी करत असे. तसेच वीरप्पन याच्यावर पोलिसाची हत्या केल्याचा आरोप सुद्धा होता. तर वीरप्पन याचा पाठलाग केल्यानंतर तब्बल 20 वर्षांनी त्याला मारण्यात आले.