Asia Cup 2025 (Photo Credit - X)

Asia Cup 2025 All Squad Teams Schedule Time and Live Streaming: आशिया चषक 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच टी-20 फॉरमॅटमध्ये 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यामुळे ही स्पर्धा 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर पाकिस्तानची कमान सलमान अली आगाकडे असेल. श्रीलंकेचे कर्णधारपद चरित असलंका सांभाळतील आणि अफगाणिस्तानचा संघ राशिद खानच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.

भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी

9 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात उद्घाटन सामना होईल. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर, टीम इंडिया 14 सप्टेंबरला पाकिस्तान आणि चार दिवसांनी ओमानसोबत भिडणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळणार आहे.

हे देखील वाचा: Asia Cup च्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकवणारे टॉप 5 फलंदाज, यादीत फक्त एका भारतीयाचा समावेश

आशिया चषक 2025 बद्दल सर्व काही 

1. स्पर्धेत किती संघ सहभागी होत आहेत?

2025 च्या आशिया चषकात 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना दोन गटांमध्ये (ग्रुप ए आणि बी) विभागले आहे:

  • ग्रुप ए: भारत, ओमान, संयुक्त अरब अमिराती, पाकिस्तान
  • ग्रुप बी: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग

2. आशिया चषक 2025 कधीपासून कधीपर्यंत खेळला जाईल?

या स्पर्धेचा पहिला सामना 9 सप्टेंबरला होईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल.

3. कोणत्या संघाने सर्वाधिक आशिया चषक जिंकले आहेत?

आठ विजेतेपदांसह भारत आशिया चषकातील सर्वात यशस्वी संघ आहे.

4. भारतात आशिया चषक 2025 चे सामने कोणत्या टीव्ही चॅनलवर दिसतील?

आशिया चषकाचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील.

5. भारतात आशिया चषक 2025 चे सामने ऑनलाइन कुठे पाहता येतील?

हे सामने भारतातील सोनीलिव्ह ॲप आणि वेबसाइटवर थेट स्ट्रीम केले जातील.

6. भारतात आशिया चषकाचे सामने मोफत कुठे पाहता येतील?

फ्री डिश वापरणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने आणि स्पर्धेतील महत्त्वाचे सामने मोफत पाहू शकतात.

टी-20 आशिया कपसाठी सर्व संघांची संपूर्ण स्क्वॉड:

1. भारत

  • कर्णधार: सूर्यकुमार यादव
  • संघ: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.

2. पाकिस्तान

  • कर्णधार: सलमान अली आगा
  • संघ: अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्जा, शाहीन आफ्रिदी, सुफियान मोकिम.

3. अफगाणिस्तान

  • कर्णधार: राशिद खान
  • संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, दरविश रसूली, सेदिकुल्लाह अटल, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, मोहम्मद नबी, गुलबदीन नायब, शराफुद्दीन अशरफ, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, अल्लाह गजनफर, नूर अहमद, फरीद मलिक, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.

4. बांगलादेश

  • कर्णधार: लिटन दास
  • संघ: तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद हिरदॉय, जेकर अली अनिक, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, शक महेदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम, शैफ उद्दीन.

5. हाँगकाँग

  • कर्णधार: यासिम मुर्तजा
  • संघ: बाबर हयात, जीशान अली, नियाजाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्जी, अंशुमान रथ, कल्हण मार्क चल्लू, आयुष आशीष शुक्ला, मोहम्मद ऐजाज खान, अतीक उल रहमान इकबाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद अरशद, अली हसन, शाहिद वासिफ, गजनफर मोहम्मद, मोहम्मद वहीद, अनस खान, एहसान खान.

6. ओमान

  • कर्णधार: जतिंदर सिंह
  • संघ: हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला, सुफियान यूसुफ, आशीष ओडेडेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.

7. यूएई

  • कर्णधार: मोहम्मद वसीम
  • संघ: अलीशन शराफू, आर्यंश शर्मा (विकेटकीपर), आसिफ खान, ध्रुव पराशर, ईथन डी’सूजा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतीउल्लाह खान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवदुल्लाह, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), रोहिद खान, सिमरनजीत सिंह, सगीर खान.

8. श्रीलंका

  • कर्णधार: चरिथ असलंका
  • संघ: कुसल मेंडिस (विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, कामिल मिशारा, दसुन शनाका, कामेंदु मेंडिस, वानिंदु हसरंगा, नुवानिदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, चामिका करुणारत्ने, महीश तीक्ष्णा, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा, बिनौरा फर्नांडो.

आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक:

  • 9 सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
  • 10 सप्टेंबर: भारत विरुद्ध यूएई
  • 11 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
  • 12 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान
  • 13 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • 14 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 15 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
  • 15 सप्टेंबर: यूएई विरुद्ध ओमान
  • 16 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
  • 17 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध यूएई
  • 18 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
  • 19 सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान

सुपर फोर टप्पा

  • 20 सप्टेंबर: बी1 विरुद्ध बी2
  • 21 सप्टेंबर: ए1 विरुद्ध ए2
  • 23 सप्टेंबर: ए2 विरुद्ध बी1
  • 24 सप्टेंबर: ए1 विरुद्ध बी2
  • 25 सप्टेंबर: ए2 विरुद्ध बी2
  • 26 सप्टेंबर: ए1 विरुद्ध बी1

फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी सुपर-4 च्या गुणतालिकेत (पॉइंट्स टेबल) टॉप-2 मध्ये असलेल्या संघांमध्ये खेळवला जाईल.