
Most Wickets in Asia Cup: आशिया कप 2025 चा थरार 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. ही स्पर्धा टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये खेळली जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता आहे. यावर्षीच्या आशिया कपचे विजेतेपद पटकावण्यासाठी एकूण 8 संघ मैदानात उतरतील. आशियाई क्रिकेट परिषदेचे पाच पूर्णवेळ सदस्य - भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान - यांना थेट प्रवेश मिळाला आहे. यासोबतच 2024 एसीसी प्रीमियर कप मधील टॉप-3 संघ - यूएई, ओमान आणि हाँगकाँग - देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
भारताचे यजमानपद, पण स्पर्धा यूएईमध्ये
आशिया कप 2025 चा यजमान भारत असला, तरी एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये होणार आहे. सर्व सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळवले जातील.
स्पर्धेचे स्वरूप आणि भारताचे वेळापत्रक
स्पर्धेतील आठ संघांना दोन गटांमध्ये विभागले आहे. दोन्ही गटांमधील अव्वल दोन संघ सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरतील. त्यानंतर, सुपर-४ मधील पहिल्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल. भारतीय संघ ग्रुप ए मध्ये आहे, ज्यात त्याच्यासोबत ओमान, पाकिस्तान आणि यूएई यांचा समावेश आहे. तर, ग्रुप बी मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि हाँगकाँग आहेत.
Asia Cup T20 इतिहासात सर्वाधिक धावा कोणी केल्या? पहा टॉप-10 फलंदाजांची यादी
आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप-5 गोलंदाज
1. लसिथ मलिंगा - श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 15 सामन्यांत 33 विकेट्स घेतल्या आहेत.
2. मुथैया मुरलीधरन - श्रीलंकेचा महान ऑफ-स्पिनर मुथैया मुरलीधरन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1995 ते 2010 या काळात खेळलेल्या 24 सामन्यांमध्ये त्याने 30 विकेट्स मिळवल्या आहेत.
3. रवींद्र जडेजा - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे नावही या विशेष यादीत आहे. त्याने 26 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, टी-20 विश्वचषक 2024 नंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यामुळे तो यंदाच्या आशिया कपमध्ये खेळताना दिसणार नाही.
4. शाकिब अल हसन - बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसन 25 सामन्यांमध्ये 28 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
5. अजंथा मेंडिस - श्रीलंकेचा रहस्यमयी फिरकीपटू अजंथा मेंडिसने फक्त 2 आशिया कप स्पर्धांमध्ये भाग घेतला. 8 सामन्यांत 26 विकेट्स घेत तो पाचव्या स्थानावर आहे. त्याची सरासरी (10.42) विशेष उल्लेखनीय आहे.