विराट कोहली (Image Credit: AP/PTI Photo)

Asia Cup 2025: आशिया कप 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले असून, या T20 स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरला होईल, तर अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळला जाईल. युएईमधील अबू धाबी आणि दुबई या दोन शहरांमध्ये हे सामने पार पडतील. या स्पर्धेत एकूण 8 संघ विजेतेपदासाठी संघर्ष करतील. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. या व्यतिरिक्त, 2024 च्या एसीसी प्रीमियर कपमधील शीर्ष तीन संघ - युएई, ओमान आणि हाँगकाँग यांनीही या स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

या आठ संघांना दोन ग्रुपमध्ये विभागले आहे:

  • ग्रुप ए: भारत, पाकिस्तान, ओमान, युएई

  • ग्रुप बी: अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँग

प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघ सुपर-4 मध्ये जातील आणि त्यानंतर त्यातून दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. (हे देखील वाचा: Asia Cup 2025: T20 युद्धात भारत-पाकिस्तान आमने-सामने; आतापर्यंत कोणाचं पारडं जड?)

T20 की वनडे? कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळला जाईल?

यावर्षीचा एशिया कप T20 फॉरमॅट मध्ये खेळला जाईल. भारतीय संघ या स्पर्धेचा गतविजेता असून, यंदाही ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

आशिया कप T20 मध्ये सर्वाधिक धावा कोणाच्या?

आशिया कप T20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 9 डावांमध्ये 429 धावा केल्या आहेत, ज्यात त्याचा सर्वोच्च स्कोअर 122* धावा आहे. हे शतक त्याने 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झळकावले होते.

आशिया कप T20 सर्वाधिक धावा काढणारे खेळाडू

खेळाडू देश सामना पारी रन सर्वोच्च धावसंख्या
1 विराट कोहली भारत 10 9 429 122*
2 मोहम्मद रिझवान पाकिस्तान 6 6 281 78*
3 रोहित शर्मा भारत 9 9 271 83
4 बाबर हयात हाँगकाँग 5 5 235 122
5 इब्राहिम झद्रान अफगाणिस्तान 5 5 196 64*
6 भानुका राजापक्षे श्रीलंका 6 6 191 71*
7 साबीर रेहमान बांग्लादेश 6 6 181 80
8 नजीबुल्लाह झद्रान अफ्गाणिस्तान 8 8 176 60*
9 मुहम्मद उस्मान यूएई 7 7 176 46
10 महमुदुल्लाह बांग्लादेश 7 7 173 36*