Coronavirus Vaccine Covishield (Photo Credits: Adar Poonawalla's Twitter)

भारतामध्ये कोरोना वायरसचा फैलाव रोखण्यासाठी 3 लस उत्पादक कंपन्यांनी DCGI कडे तातडीच्या वापरासाठी अर्ज केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यापैकी सीरम इन्स्टिट्युटच्या (Serum Institute) कोविशिल्ड (Covishield) लसीला भारतामध्ये पहिली मंजुरी मिळू शकते अशी दाट शक्यता आहे. दरम्यान ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीची ही मूळची लस आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिट्युट त्याचं उत्पादन करत असून कोविशिल्ड या नावाने मानवी चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान पुढील आठवड्यात ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर भारतामध्येही कोविड 19 प्रतिबंधक समितीचे तज्ञ त्याचा आढावा घेऊन भारतामध्येही तातडीने लसीच्या वापराला मंजुरी देऊ शकतात असा कयास लावला जात आहेत. COVID-19 Vaccine: पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने Covishield लसीच्या वापरासाठी DCGI कडे केली मागणी.

सीरमच्या कोविशिल्ड सोबतच भारत बायोटेक आणि फायझर कंपनीकडून देखील तातडीच्या वापरासाठी परवानगी द्यावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान भारत बायोटेकच्या अद्याप 3 र्‍या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत. तर फायझर कंपनीकडूनही प्रेझेंटेशन अद्याप देण्यात आले नसल्याने भारतात तातडीच्या वापरासाठी लस उत्पादक कंपन्यांच्या सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आता सीरम बाजी मारू शकते असा अंदाज आहे. मागील आठवड्यातच सीरमकडून काही आवश्यक अधिकची माहिती देखील पुरवण्यात आली आहे. Emergency Use Authorisation म्हणजे काय? Moderna, Pfizer ते SII यांना त्यांची COVID-19 Vaccines बाजारात आणण्यासाठी नेमकी कशाची प्रतिक्षा.

ब्रिटनमध्ये कोरोना वायरसमध्ये म्युटेशन झाले आहे. त्यामुळे नवा कोरोना वायरस अधिक वेगाने संसर्ग पसरवू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या लंडनसह जगभरात भीतीचं वातावरण आहे. मात्र सध्या मंजुर झालेल्या लसी म्युटेट झालेल्या वायरसवरही परिणामक असेल असे सांगितले जात आहे. त्याचा लसीच्या निर्मितीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुण्यातील या कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका सोबत करार केला आहे. या कंपनीने 40 मिलियन डोस बनवलेले आहेत.