Emergency Use Authorisation म्हणजे काय? Moderna, Pfizer ते SII यांना त्यांची COVID-19 Vaccines बाजारात आणण्यासाठी नेमकी कशाची प्रतिक्षा
Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना वायरस संकटाशी झुंजणारं अवघं जागा आता त्याला रोखण्यासाठी लसीच्या प्रतिक्षेमध्ये आहे. दरम्यान सध्या कोरोना वायरसवर 95% प्रभावी असल्याचं सांगत अमेरिकेमध्ये Moderna Inc आणि Pfizer या दोन्ही लसी Emergency Use Authorisation साठी उत्सुक आहेत. त्यासाठी त्यांनी अमेरिकेच्या एफडीएकडे अर्ज देखील सादर केले आहेत.  Moderna Inc ने अमेरिकेसोबतच युरोपियन रेग्युलेटर्सकडेही अर्ज केले आहेत. युरोपात ही लस mRNA-1273 म्हणून ओळखली जाते. त्याप्रमाणे भारतात कोविशिल्डची निर्मिती करणार्‍यासीरम इन्स्टिट्युटने देखील पुढील 2 आठवड्यात Emergency Use Authorisation ची आशा व्यक्त केली आहे. Oxford University and AstraZeneca यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोविशिल्डची निर्मिती केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच सीरमला भेट दिली आहे. Covid-19 Vaccine Update: FDA कडून लसीच्या मंजूरीसाठी मॉडर्ना कंपनीकडून अर्ज; कोरोना बाधित काही रुग्णांमध्ये लस 100% परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा.

Emergency Use Authorisation म्हाणजे काय?

सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध करून देण्यापूर्वी लसीची निर्मिती करणार्‍यांना अमेरिकेत US FDA तर भारतामध्ये Central Drugs Standard Control Organisation (CDSCO)ची मंजुरी आवश्यक असते. लसीप्रमाणेच औषधं आणि अन्य मेडिकल उपकरणांनादेखील ही मंजुरी आवश्यक आहे. लस मंजुर करताना त्याचा प्रभावीपणा आणि सुरक्षा लक्षात घेतली जाते.

लसीचा इफेक्टिव्हनेस आणि सुरक्षा पडताळून पाहण्याची प्रक्रिया ही फार मोठ आणि वेळखाऊ आहे. आतापर्यात सर्वात जलद ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साडेचार वर्षांचा कालावधी लागला आहे. मात्र सध्या जग एका Pandemic मधून जात असताना मात्र सरकारी यंत्रणांकडे अंतरिम मंजुरी देण्याची मुभा असते.

जेव्हा लसीच्या सुरक्षेचे आणि प्रभावी असण्याचे पुरेसे पुरावे असतील तेव्हा आऊटब्रेक थांबवण्यासाठी रेग्युलेटरी अथॉरिटीज Emergency Use Authorisation देतात. यामुळे लसीचा वापर सर्वसामान्यांवर करता येऊ शकतो. याचा सोपा अर्थ म्हणजे लसीला अंतिम मंजुरी मिळण्याआधीच तीचा सर्वसामान्यांसाठी वापर करण्याकरिता मिळालेली मंजुरी.