Coronavirus | Representational Image (Photo Credits: Pixabay)

सध्या जगासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन JN.1 सब-व्हेरिंयट वेगाने पसरताना दिसत आहे. नव्याने आढळण्याच्या रुग्णांमधील बहुतांश प्रकरणे JN.1 सब-व्हेरिंयटची असल्याने चिंता वाढली आहे.  कोरोना (Covid-19) महामारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. भारतातील दररोज कोविड-19 संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी कोरोना रुग्णांच्या 774 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा JN.1 सब-व्हेरिंयट अतिशय वेगाने पसरणारा असला, तरी याची लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्ण याच्या संसर्गातून लवकर बरे होते आहे.  (हेही वाचा - COVID-19 India Update: भारतात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले, गेल्या 24 तासात 756 नवीन रुग्ण, 5 जणांचा मृत्यू)

कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिंग आणि संशोधन सुरु आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे JN.1 बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. कोरोनाचा अभ्यास करणार्‍या संशोधकांनी म्हटलं आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-19 विषाणूची सवय झाली आहे.

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल.