Budget 2021: कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत आरोग्य विभागाकडून अहोरात्र सेवा पुरवली जात आहे. त्यामुळे याच क्षेत्रातील कंपन्यांचे असे म्हणणे आहे की, सध्याची परिस्थिती पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य बजेटमध्ये वाढ करण्यात यावी. केंद्राचे सामान्य बजेच 2021-22 रोजी 1 फेब्रुवारी 2021 ला मांडले जाणार आहे.(ITR भरल्यानंतर 7 दिवसानंतर Refund मिळाला नाही? जाणून घ्या कोणत्या चूका असण्याची शक्यता)
फार्मा क्षेत्राने जगातील फार्मेसीमध्ये प्रमुख भुमिका बजावली आहे. फार्मा क्षेत्राला अपेक्षा आहे की, आगामी अर्थसंकल्पात विशेष रुपात संशोधन आणि विकास आणि नाविन्य यासाठी समर्थन दिले जाईल. नेटहेल्थच्या अध्यक्षा आणि अपोलो हॉस्पिटलच्या कार्यकारी वाइस चेअरपेअर्सन प्रीता रेड्डी यांनी पीटीआय यांना असे म्हटले की, कोरोना व्हायरसमुळे देशातील आरोग्य क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत.
आयसीईएने फेब्रुवारीत मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी मोबाईल उद्योगासाठी जीएसटी मध्ये कपात करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. आयसीईएने मार्च 2020 मध्ये जीएसटी मध्ये 50 टक्क्यांहून अधिक उद्योगासाठी एक मोठा झटका दिला होता.
आयसीईएचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रु यांनी एका विधानात असे म्हटले की, प्रत्येक भारतीयाच्या हातात स्मार्टफोन दिसणे आणि 80 अरब डॉलर स्वदेशी मोबाईल फोन बाजार सुनिश्चित करण्यासाठी मोबाईल फोनवर जीएसटी 18 टक्क्यांहून 12 टक्के करण्याची आवश्यकता आहे.(मार्चमध्ये चलनातून बाद होणार 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा? जाणून घ्या म्हणाले RBI)
तसेच इलेक्ट्रॉनिक्स विकासाच्या प्रमुख क्षेत्रांसाठी विविध सेंटर ऑफ एक्सिलेंसच्या स्थापनेसाठी 500 कोटी रुपयांच्या बजेट आणि मोबाईल डिझाइन सेंटरसाठी 200 कोटी रुपयांच्या बजेटची सिफारीश केली आहे. अन्य सिफारीशीव्यतिरिक्त उद्योग विभागाने 1 हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी 5 टक्के व्याज आणि 100 कोटी रुपयांची क्रेडिट गॅरंटीची मागणी सुद्धा केली आहे.