Income Tax Refund Status / ITR Refund Status: केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) ने नुकतेच असे म्हटले की, 1 एप्रिल 2020 पासून ते 11 जानेवारी 2021 दरम्यान 1.57 कोटी अधिक करदात्यांना 1,73,139 कोटी रुपयांहून अधिक आयटीआर रिफंड जाहीर केले आहे. आयटी रिटर्न भरण्यासाठी मुदतीच्या तारखेच्या पुढील मुदतवाढीच्या प्रतीक्षेत सर्व करदात्यांची अपेक्षा सीबीडीटीने स्पष्टपणे सांगितली आहे की, ज्या करदात्यांनी मर्यादित वेळेपर्यंत आयटी रिटर्न दाखल केले नसल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे. या प्रक्रियेत वेळ दवडू शकत नाही. या कारणामुळे कर विभागच्या कार्यप्रणाली आणि सरकारच्या कल्याणकारी कार्यक्रमात अडथळा येऊ शकतो.
सीबीडीटी नुसार, 2019-20 मध्ये निश्चित वेळेपर्यंत जवळजवळ 5.62 कोटी आयकर रिटर्न दाखल करण्यात आले होते. या वर्षाच्या 10 जानेवारी पूर्वीच 5.95 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षात दाखल करण्यात आलेल्या रिटर्न आकड्यानुसार स्पष्ट होते की, ही आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे. याच दरम्यान असे काही टॅक्सपेअर्स आहेत ज्यांना आतापर्यंत आयटीआर रिफंड मिळालेला नाही.(ATM मधून पैसे काढल्यानंतर ताबडतोब करा 'हे' काम अन्यथा होऊ शकते फसवणूक!)
जर टॅक्सपेअरने चार पाच महिन्यांपूर्वी आयटीआर फाइल केल्यास अशा वेळी टॅक्सपेअर्ससाठी आयआटीआर रिफंडची वेळ जाणून घेणे अधिक महत्वपूर्ण आहे. नियमानुसार आयटीआर फाइल केल्यानंतर सात दिवसाच्या कार्यकाळात आयटीआर रिफंड केले जाते. मात्र काही सामान्य चुकांमुळे आयटीआर रिफंड मिळण्यास वेळ लागू शकतो. तर जाणून घ्या कोणत्या चूका तुम्ही केल्या असू शकतात.
>>बँक खात्याबद्दल चुकीची माहिती
आयकर विभाग टॅक्सपेअर्सच्या बँक खात्यामधून थेट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आयटीआर रिफंड ऑनलाईन देतात. अशा स्थितीत, जर टॅक्सपेअर्सने आयकर फॉर्म भरताना बँक खात्यासंबंधित चूक केल्यास त्याचा आयकर रिफंट अटकू शकतो. टॅक्सपेअर्सला आपल्या खात्याबद्दलची माहिती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सुधारता येणार आहे.
>>बँक खात्याचे प्री वेरिफिकेशन न होणे
आयटीआर रिफंड 2020 साठी मर्यादित वेळेपेक्षा विलंब लागणे हे दुसरे मुख्य कारण असू शकते. खरंतर व्यक्तीच्या बँक खात्याच्या क्रमांकाचे प्री वेरिफिकेशन होणे गरजेचे आहे. जर टॅक्सपेअरचे बँक खात्याचे वेरिफिकेशन न झाल्यास ज्यामध्ये आयकर विभाग आयटीआर रिफंड करणार असल्यास तुमचे काम पूर्ण होण्यासाठी अडथळा येऊ शकतो. यासाठीच टॅक्सपेअरला आयकर विभागासंबंधित बँक खात्याचे वेरिफिकेशन करणे अत्यंत गरजेचे आहे.(Post Office National Savings Certificate Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस योजनेत केवळ 5 वर्षात मिळणार 21 लाख रुपये; 100 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक)
>>आयटीआरचे वेरिफिकेशन न होणे
आयटी रिटर्न भरल्यानंतर टॅक्सपेअर्सला आयटीआरचे वेरिफिकेशन करणे अत्यावश्यत आहे. काही वेळेस असे दिसून आल आहे की, टॅक्सपेअर वेळेवर आयटीआर फाइल करतो पण त्याचे वेरिफकशन करत नाही. अशा स्थितीत आयटीआर रिफंड ही मिळू शकत नाही. यासाठीच टॅक्सपेअरने आयटीआर रिफंड लवकर मिळवण्यासाठी हे काम चुकून सुद्धा विसरु नये.
वरील काही गोष्टींबद्दल तुम्ही सुद्धा जर चुका केल्या असतील तर त्या ऑनलाईन पद्धतीने सुधारु शकता. तसेच या संबंधित अधिक माहिती आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला मिळणार आहे.