'काँग्रेसमुक्त' (Congress) भारताचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारतीय जनता पक्षाला दक्षिण भारतातूनच हद्दपार (South India BJP-free) व्हावे लागले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालातून (Karnataka Election Result 2023) हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा अनपेक्षीत असा दारुन पराभव झाला. केवळ पराभवच नव्हे तर भाजपला कर्नाटक या बालेकिल्ल्यात चक्क नऊ जिल्ह्यातून हद्दपार व्हावे लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात मोठमोठ्या घोषणा आणि आक्रमक प्रचार करणाऱ्या भाजपला मतदारांनी नऊ जिल्ह्यांमध्ये एकही जागा दिली नाही. म्हणजेच कर्नाटकातील या जिल्ह्यांमध्ये मतदारांनी 'कमळा'ला धूळ ( 'lotus' on backfoot in South India ) चारली आहे. कर्नाटक (Karnataka ) सोबतच दक्षिण भारतातील प्रमुख राज्ये असलेल्या Kerala (केरळ), Tamil Nadu (तामिळनाडू), Telangana (तेलंगणा), Andhra Pradesh (आंध्र प्रदेश) राज्यांमध्ये भाजपची स्थिती काय आहे घ्या जाणून.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खडगे यांनीही भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडल असून, ज्यांना 'काँग्रेस मुक्त भारत' हवा होता, त्यांना 'भाजप मुक्त दक्षिण भारत'चा सामना करावा लागला. अहंकारी वक्तव्ये आता चालणार नाहीत आणि लोकांचे दुःख समजून घेतले पाहिजे, असे म्हणत श्री. खर्गे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. (हेही वाचा, PM Narendra Modi In Karnataka Elections: पीएम नरेंद्र मोदी प्रभावशून्य, 19 रॅली, 6 रोड शो फ्लॉप; कर्नाटक काँग्रेस'च्या 'पंजा'त; भाजपचे कमळ पराभवाच्या चिखलात)
कर्नाटक गेले, पुद्दुचेरीत युतीमुळे अस्तित्व
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने पक्षाने आता दक्षिण भारतातील पाच राज्यांपैकी भाजपकडे एकही राज्य नाही. कर्नाटकच्या रुपात भाजपने पाच राज्यांमधील शेवटचा गड रिकामा केला आहे. कर्नाटक हे दक्षिणेतील एकमेव राज्य होते जेथे, भाजपने स्वबळावर सरकार स्थापन केले होते. सध्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपचा समावेश असलेली युती सत्तेत आहे. पक्षाची हिंदुत्वाची फळी, आरक्षणाचा डाव, कल्याणकारी योजनांची आश्वासने आणि अगदी पंतप्रधानांच्या मॅरेथॉन रॅलींनाही विजय मिळवता आला नाही. (हेही वाचा, Why BJP Lost Karnataka: 'टांगा पलटी घोडा फरार..', भाजपने कर्नाटक का गमावले? काँग्रेस विजयाची प्रमुख कारणे; घ्या जाणून)
केरळ: भाजपला एकही आमदार नाही
केरळ विधानसभेत सध्या भाजपकडे एकही आमदार नाही. केरळमधील एकमेव भाजप आमदार ओ राजगोपाल होते, जे 2016 मध्ये तिरुअनंतपुरममधील नेमोममधून विजयी झाले. तथापि, 2021 च्या निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
तामिळनाडू: AIADMK सोबत युतीमुळे 4 जागा जिंकल्या
तामिळनाडूमध्ये, भाजपने 2021 च्या निवडणुकीत AIADMK सोबत युती करून चार जागा जिंकल्या. मात्र, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दोन दशकांनंतर भाजपला एकही जागा मिळवता आली नाही. भाजपने तामिळनाडूमध्ये आपले लक्ष केंद्रित केले असले तरी, प्रयत्नांना लगेचच निवडणूक लाभ दिसण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. (हेही वाचा, Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया)
तेलंगणा: केवळ एक जागा
तेलंगणात २०१४ मध्ये भाजपने पाच जागा जिंकून आघाडी घेतली असली तरी 2018 च्या निवडणुकीत ही संख्या फक्त एकावर आली. गोशामहल मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार राजा सिंह हे भगव्या पक्षाचे एकमेव आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, भाजपने तेलंगणामध्ये 17 पैकी 4 खासदार जागा जिंकल्यामुळे त्यांची संख्या सुधारली. पक्षाला एकूण मतांपैकी जवळपास 19.45% मते मिळाली. दरम्यान, तेलंगणातील दुब्बका आणि हुजुराबाद मतदारसंघातील दोन पोटनिवडणुकांमध्ये भाजपचे नशीब मात्र चमकले आहे. दोन पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर पक्षाची संख्या तीन आमदारांवर पोहोचली आहे.
आंध्र प्रदेश- विभाजनाचा फायदा, मात्र जागा वाढण्यास यश नाही
आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणूक 2014 मध्ये भाजपने चार जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत मात्र, भगवा पक्ष आपले खाते उघडू शकला नाही. जगन मोहन रेड्डी यांना 'हिंदूविरोधी' मुख्यमंत्री म्हणून चित्रित करण्यासाठी भाजप पक्ष अनेक मुद्दे उचलून धरत आहे. पण तरीही तेथे म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.
दरम्यान, कर्नाटकातील पराभवासह, परिणामाचा परिणाम शेजारच्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये जाणवेल, असे राजकीय विश्लेषक म्हणत आहे. सध्याचा मतदानाची आकडेवारी विचारात घेता ट्रेंडही तेच सांगताना दिसतो आहे.