PM Narendra Modi In Karnataka Elections: पीएम नरेंद्र मोदी प्रभावशून्य, 19 रॅली, 6 रोड शो फ्लॉप; कर्नाटक काँग्रेस'च्या 'पंजा'त; भाजपचे कमळ पराभवाच्या चिखलात
Narendra Modi | | (Photo Credit : ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा भाजपला (BJP) निवडणूक एकहाती जिंकून देण्याचा करीश्मा संपुष्टात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election Results 2023) मध्ये काँग्रेस (Congress) पक्षाने भाजपची 38 वर्षांची सत्ता मोडीत काढली. कर्नाटकमध्ये काँग्रेसने एकहाती बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. कर्नाटकचा निकाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कर्नाटकमध्ये काढलेल्या तब्बल 19 रॅली, 6 रोड शो फ्लॉप ठरल्याचे चित्र आहे. भाजपनेही आपली हार जवळपास मान्य केल्याचे संकेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिले. एकूणच काय तर कर्नाटक काँग्रेसच्या पंजात आल्याचे पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे कमळ पराभवाच्या चिखलात रुतल्याचे चित्र आहे.

रोडशो आणि सभांचा धडाका

काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने पूरेपूर ताकद लावली. त्यासाठी केंद्रीय नेतृत्वापासून ते स्थानिक पातळीपर्यंत नेत्यांची एक फौजच कामाला लावली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने कर्नाटक राज्यामध्ये तब्बल 3116 निवडणूक प्रचार सभा घेतल्या. राज्यातील 311 मंदिरे आणि मठांना भेटी दिल्या, 9125 सार्वजनिक सभा, 1377 रोड शो, 9077 रस्ता सभा घेतल्या. (हेही वाचा, Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया)

नरेंद्र मोदी आणि भाजपचा भ्रमाचा भोपळा

भाजपने एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 19 रॅली, 6 रोड शो घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपची हुकमी तोफ होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचारात उतरवले की, विजय निश्चित असेच जणून भाजपच्या धुरीणांना वाटत होते. मात्र, भाजपचा हा भ्रमाचा भोपळा फुटल्याचे पाहायला मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या 19 रॅली, 6 रोड शो वगळून भाजपच्या एकूण 128 राष्ट्रीय नेत्यांनी कर्नाटकात प्रचार केला. (हेही वाचा, Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video .)

भाजपकडून हाय होल्टेच प्रचार

नरेंद्र मोदी (पंतप्रधान)- 19 रॅली, 6 रोड शो

अमित शाह (केंद्रीय गृहमंत्री)- 16 रॅली, 15 रोड

जेपी नड्डा (भाजप अध्यक्ष)- 10 रॅली, 16 रोड

स्मृती इराणी (केंद्रीय मंत्री)- 17 सार्वजनिक सभा, 2 रोड शो

योगी आदित्यनाथ (मुख्यमंत्री उत्तर प्रदेश)- नऊ रॅली, तीन रोड शो

हिमंता बिस्वा सरमा (मुख्यमंत्री, आसाम)-15 रॅली आणि एक रोड शो

शिवराज सिंह चौहान (मुख्यमंत्री, मध्य प्रदेश)- सहा रॅली,एक रोड शो

CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस- 17 रॅलींत भाषण

भाजपने कर्नाटकमध्ये प्रचारासाठी उतरवलेले इतर नेते

केंद्रीय मंत्री- निर्मला सीतारामन, एस जयशंकर, अश्विनी वैष्णव, गजेंद्र सेखावत, व्ही के सिंग, अर्जुन मुंडा, ज्योतिरादित्य सिंधिया, जी किशन रेड्डी, अर्जुन राम मेघवाल, साध्वी निरंजन ज्योती

भाजप शासीत राज्यांचे मुख्यमंत्री- योगी आदित्यनाथ, शिवराज सिंह चौहान, हिमाता बिस्वा शर्मा, एकनाथ शिंदे (महाराष्ट्र), देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

भाजपने गमावला किल्ला

भारतीय जनता पक्षाने (BJP) दक्षिण भारतात असलेला आपला एकमेव किल्ला कर्नाटक विधानसभा (Karnataka Assembly Election Result 2023) निवणुकीच्या रुपात गमावला आहे. काँग्रेसने 224 पैकी 130 जगांवर आघाडी घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. कर्नाटकमध्ये भाजपला केवळ 60 जागांवर आघाडी मिळत असल्याचे चित्र आहे. भाजपचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पंप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू ओसरु लागली आहे की काय? असा सवा उपस्थित केला जातो आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेसने 130, भाजप 60 तर एचडी कुमारस्वामी (Basavaraj Bommai) यांच्या जेडीएस (JD(S)) पक्षाने 20 जागांवर आघाडी घेतली आहे.

पंतप्रधानांनी प्रयत्न करुनही आम्ही जिंकू शकलो नाही- बोम्मई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कार्यकर्त्यांन अनेक प्रयत्न करुनही आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही. सर्व निकाल आल्यानंतर आम्ही पराभवाचे विश्लेषण करु असे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पुनरागमण करण्यासाठी आम्ही या निवडणुकीचे सखोल चिंतन करु.

काँग्रेसचा विजय निश्चीत- सिद्धरमय्या

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत काँग्रेस या वेळी कर्नाटकमध्ये 120 जागा सहज पार करेल असे म्हटले आहे.