Why BJP Lost Karnataka: 'टांगा पलटी घोडा फरार..', भाजपने कर्नाटक का गमावले? काँग्रेस विजयाची प्रमुख कारणे; घ्या जाणून
BJP vs Congress in Karnataka | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election Results 2023) भाजपचा दणदणीत पराभव (Why BJP Lost Karnataka) झाला. या पराभवामुळे भाजपवर देशभरातून टीका होत आहे. तर, भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते अत्यंत माफक प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही राजकीय विश्लेषकांनी कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव का झाला? याचे विश्लेषण सुरु केले आहे. पाठीमागच्या 38 वर्षांची परंपरा भाजपला का राखताना आली नाही, याची विविध कारणे पुढे येऊ लागली आहेत. यासोबत काँग्रेसच्या (Congress) विजयावरही खूप लिहिले बोलले जाऊ लागले आहेत.त्यामुळे काँग्रेसच्या विजयाच्या कारणांचीही शोध घ्यायला हवा.

राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा'

काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या 'भारत जोडो यात्रा' खरोखलच काँग्रेससाठी संजीवणी ठरली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देशातील नागरिकांचा राहुल गांधी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला. परिणाम कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी 40 टक्क्यांच्या पुढे गेली आहे, जो अलीकडच्या काही वर्षांतील विक्रम आहे. विशेष म्हणजे मंड्या आणि हसन यांचा समावेश असलेला पारंपरिक वोक्कलिगा पट्टाही काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. अनेक दशकांनंतर काँग्रेसलाही राज्यात लिंगायतांचा थोडाफार पाठिंबा मिळाला आहे.

कर्नाटकात भाजपचा स्वबळावर प्रभाव शून्य

आजवरचा इतिहास पाहता कर्नाटकात भाजप स्वबळावर कधीच सत्तेवर आलेला नाही. भाजपची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी 2008 मध्ये झाली आहे. भाजपने 2008 मध्ये स्वबळावर 110 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच तेव्हाही भाजपला पूर्ण बहुमतात सत्ता मिळवता आली नव्हती. 2018 मध्ये 104 जागा मिळाल्या. दोन्ही वेळा, इतर पक्षांकडून पक्षांतर करून आपली ताकद वाढवली. त्यामुळे भाजपची कर्नाटकमध्ये सत्ता असली तरी मोठ्या प्रमाणावर ताकद कधीच नव्हती. (हेही वाचा, Rahul Gandhi on Karnataka Election Results 2023: 'शक्ती' ला 'ताकदी' ने हरवलं... कर्नाटक मधील कॉंग्रेसच्या दणदणीत विजयावर राहुल गांधींची प्रतिक्रिया)

भाजपचा जातियवादी प्रचार

कर्नाटकात भाजपने अत्यंत जातीयवादी प्रवास केला. खास करुन बुरखा, हिजाब आणि इतर धार्मिक गोष्टींचा नको इतका प्रचार आणि प्रसार भाजपने केला. ज्यामुळे भाजपला निवडणुकीत फटका बसला. (हेही वाचा, Karnataka Assembly Election 2023: विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयानंतर DK Shivakumar झाले भावूक; पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदारांचे मानले आभार, Watch Video .)

काँग्रेसचा नियोजनबद्ध प्रचार

कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पक्षाचे विचार लोकांपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवले. प्रयत्न आणि शिस्तबद्ध प्रचार यात काँग्रेसने कसूर ठेवली नाही. परिणामी काँग्रेसच्या आक्रमक आणि सकारात्मक प्रचारापुढे भाजप टीकाव धरु शकला नाही. काँग्रेसने केवळ स्वत:चीच राजकीय प्रचार प्रणाली अवलंबली नाही. तर त्यासोबतच जाहीरात कंपन्यांचीही मदत घेतली. (हेही वाचा, PM Narendra Modi In Karnataka Elections: पीएम नरेंद्र मोदी प्रभावशून्य, 19 रॅली, 6 रोड शो फ्लॉप; कर्नाटक काँग्रेस'च्या 'पंजा'त; भाजपचे कमळ पराभवाच्या चिखलात)

काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली अश्वासने लोकांना भावल्याचे दिसूनयेते. खास करुन गृह ज्योती योजनेंतर्गत सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज देण्याची ऑफर. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (बीपीएल) सार्वजनिक वितरण योजनेंतर्गत (पीडीएस) 4 किलो तांदूळही मोफत मिळवण्यासाठी संघर्ष करत असताना, काँग्रेसने प्रतिमानसी 10 किलो तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. ही सर्व आश्वासने मतदारांना निश्चितच आकर्षक वाटली. विशेषत: एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांसाठी.

येडियुरप्पा यांचे राजकारणापासून अलिप्तपण

ज्येष्ठ भाजप नेते, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी सक्रीय राजकारणापसू अलिप्तता दर्शवली. येडीयुरप्पा हे लिंगायत नेते आहेत. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाचा मोठा प्रभाव आहे. मधल्या काळात येडीयुरप्पा यांना भाजपने सत्ताकारण आणि पक्ष यातून बाजूला केले. परीणामी लिंगायत समाजात भाजपविरोधात काहीशी परकेपणाची भावना होती. त्याचाही फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला.