Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोरोना वायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी आता औषधनिर्माण कंपनीकडून त्यांच्या लस बाजारात लवकरात लवकर उतरवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. भारतामध्ये काल सीरम इन्स्टिट्युट (SII) पाठोपाठ आयसीएमआर आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) 'कोवॅक्सिन'(Covaxin) लसीला बाजारात आणण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. काल भारत बायोटेक कडून देखील तातडीच्या वापरासाठी मंजुरी मिळावी याकरिता भारतातील ड्र्ग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे अर्ज करण्यात आला आहे. Emergency Use Authorisation म्हणजे काय? Moderna, Pfizer ते SII यांना त्यांची COVID-19 Vaccines बाजारात आणण्यासाठी नेमकी कशाची प्रतिक्षा.

हैदराबाद स्थित भारत बायोटेक 'कोवॅक्सिन' ही स्वदेशी लस विकसित करत आहे. त्यासाठी देशभर विविध शहरांत मानवी चाचण्या टप्प्यात सुरू आहेत. कोवॅक्सिनचे दोन शॉर्ट्स घेणं गरजेचे आहे. यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. त्यानंतर 14 दिवसांत शरीरात अ‍ॅन्टीबॉडीज निर्माण होऊ शकतात असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. भारत सरकारने यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार लस उपलब्ध झाल्यास प्रामुख्याने ती आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यांना दिली जाणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही स्वदेशी लसीच्या निर्मितीचा स्वतः जातीने जाऊन आढावा घेतला आहे. Covaxin लस घेऊनही कोविड-19 ची बाधा झालेले हरियाणाचे गृहमंत्री Anil Vij यांनी लसीबद्दल दिली 'ही' महत्त्वपूर्ण माहिती.

दरम्यान भारतामध्ये सध्या 3 लसी DCGI कडे त्यांना भारतामध्ये तातडीने लसीकरणाला मंजुरी मिळावी याकरिता अर्ज घेऊन आल्या आहेत. यामध्ये सीरम आणि भारत बायोटेकची लस स्वदेशी आहे. तर फायझर या अमेरिकन कंपनीची लस देखील भारतामध्ये लसीकरणाच्या मंजुरीसाठी प्रतिक्षेमध्ये आहे. सध्या युके आणि बहरीन मध्ये फायझरला तातडीच्या वापरासाठी लस देण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.