खुशखबर! रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी आजपासून 10 नवीन 'सेवा सर्व्हिस' रेल्वे सुरु
Railway | Image used for representational purpose | (Photo Credits: Facebook)

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 'सेवा सर्व्हिस' (Seva Services) रेल्वे अशी नवीन सेवा सुरु करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने आजपासून 10 नवीन रेल्वे सुरु केल्या आहेत. या सर्व रेल्वे पॅसेंजर आहेत. ऐन सणासुदीच्या काळात विशेष करुन दिवाळीचे औचित्य सुरु केलेली ही रेल्वे सेवा प्रवाशांची खूपच सोयीची ठरणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal), पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला.

'सेवा सर्व्हिस' ट्रेन्समधील काही ट्रेन्स या दररोज तर काही ट्रेन्स आठवड्यातून सहा वेळा चालवण्यात येणार आहेत. दिल्ली आणि शामली, भुवनेश्वर आणि नारायणगड शहर, मुरकंगसेलेक आणि डिब्रूगड, कोटा आणि झालावाड, कोईमबतूर आणि पलानी दरम्यान रोज या रेल्वे धावणार आहेत. वडनगर आणि महेसाणा, असारवा आणि हिंमतनगर, करुर आणि सलेम, यशवंतपूर आणि तुमुकूर, कोईंबतूर आणि पोल्लाची दरम्यान आठवड्यातून सहा वेळा ट्रेन्स चालवण्यात येणार आहे.

तसेच रेल्वेने एक नवीन वेळापत्रक तयार केले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी दिल्ली आणि शामली दरम्यान एक नवीन रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. दिल्ली जंक्शनवरुन सकाळी 8.40 मिनिटाला सुटेल तर सकाळी 11.50 मिनिटाला ती शामली येथे पोहोचणार आहे.

हेदेखील वाचा- Diwali 2019 Special Trains: मध्य रेल्वे वर धावणार दिवाळी विशेष 36 ट्रेन्स; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग कसं कराल?

मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळी सणानिमित्त पर्यटक आणि रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 36 विशेष गाड्या सोडल्या आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनल्स, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते नागपूर, पुणे या मार्गावर काही विशेष गाड्या धावणर आहेत. रेल्वेच्या नियमांनुसार चार महिने आधी तिकीट बुकिंग सुरू केलं जातं. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या दिवसांत अनेक गाड्यांचं तिकीट हाऊस फुल्ल बुकिंग झालं आहे. त्यामुळे आयत्यावेळेस ट्रीपचा प्लॅन करणार्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने नव्या गाड्यांची घोषणा केली आहे.