प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit: archived, edited, representative image)

Must Read 100 Marathi Books: आज, 23 एप्रिल रोजी जगभरात जागतीक पुस्तक दिन (World Book Day) साजरा केला जात आहे. पुस्तक प्रेमींसाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. पुस्तका स्थान आपल्या जीवनात, समाज विकासात, अनुभव समृद्धीमध्ये अढळ आहे. मातीच्या गोळ्याला आकार देऊन जशी मूर्ती तयार होते, तसेच पुस्तके आपल्या आयुष्याला आकार देत असतात. विचार करायचे अंतर्मन, जग पाहण्याची वेगळी दृष्टी पुस्तके प्रदान करतात. मराठी भाषेत साहित्याची फार मोठी परंपरा आहे. साधारण 12 व्या शतकापासूनचे मराठी साहित्याचे संदर्भ उपलब्ध आहेत, मात्र त्याही आधीपासून मराठी साहित्यामध्ये भर पडली असल्याचे जाणकार सांगतात.

संत ज्ञानेश्वर (सन 1275 ते सन 1296) यांनी सन 1290 मध्ये लिहिलेले भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) आणि अमृतानुभव ही काव्ये जगतविख्यात आहेत. त्यानंतर मराठीला सुगीचे दिवस प्राप्त झाले. त्यात पुढे विविध संतांनी ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा  अशा अनेक गोष्टींनी भर घातली. 19 व्या शतकाच्या कालखंडामध्ये मराठी भाषेचे स्वरूप बरेच बदलले, भाषेला अनेक अलंकार प्राप्त झाले. गद्य, पद्य, नाटके यांमध्ये नव नवीन प्रयोग घडू लागले. एकूणच मराठी साहित्य बरेच समृध्द झाले. आज या जागतिक पुस्तक दिनानिमित्त आम्ही ‘वाचायलाच हवीत अशी 100 मराठी पुस्तकांची’ यादी देत आहोत.

1) ययाती - वि. स. खांडेकर

2) वळीव - शंकर पाटील

3) एक होता कार्वर - वीणा गवाणकर

4) शिक्षण - जे. कृष्णमूर्ती

5) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम - शंकरराव खरात

6) यक्षप्रश्न - शिवाजीराव भोसले

7) बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

8) तीन मुले - साने गुरुजी

9) तो मी नव्हेच - प्र. के. अत्रे.

10) आय डेअर - किरण बेदी

11) व्यक्तिमत्त्व संजीवनी - डॉ. वाय. के.शिंदे

12) मृत्युंजय - शिवाजी सावंत

13) फकिरा - अण्णाभाऊ साठे

14) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे

15) बुद्धीमापन कसोटी - वा. ना. दांडेकर

16) पूर्व आणि पश्चिम - स्वामी विवेकानंद

17) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव - स्वामी विवेकानंद

18) निरामय कामजीवन - डॉ. विठ्ठल प्रभू

19) आरोग्य योग - डॉ. बी.के.एस. अय्यंगार

20) अंधश्रधा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - डॉ. नरेंद्र दाभोळकर

21) लोकमान्य टिळक - ग. प्र. प्रधान

22) राजयोग - स्वामी विवेकानंद

23) तरुणांना आवाहन - स्वामी विवेकानंद

24) सत्याचे प्रयोग - मो. क. गांधी

25) योगासने - व. ग. देवकुळे

(हेही वाचा: ज्ञानेश्वरांपासून ते खांडेकरांपर्यंत मराठी भाषेला असे लाभले वैभव)

26) १८५७ ची संग्राम गाथा - वि.स.वाळिंबे

27) कर्मयोग - स्वामी विवेकानंद

28) गाथा आरोग्याची - डॉ. विवेक शास्त्री

29) रणांगण - विश्राम बेडेकर

30) बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे

31) श्यामची आई - साने गुरुजी

32) माझे विद्यापीठ ( कविता ) - नारायण सुर्वे

33) १०१ सायन्स गेम्स - आयवर युशिएल

34) व्यक्ति आणि वल्ली - पु.ल.देशपांडे

35) माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगुळकर

36) उचल्या - लक्ष्मण गायकवाड

37) अमृतवेल - वि.स.खांडेकर

38) नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर

39) हिरवा चाफा - वि.स.खांडेकर

40) क्रोंचवध - वि.स.खांडेकर

41) झोंबी - आनंद यादव

42) इल्लम - शंकर पाटील

43) ऊन - शंकर पाटील

44) झाडाझडती - विश्वास पाटील

45) नाझी भस्मासुराचा उदयास्त - वि.ग. कानिटकर

46) बाबा आमटे - ग.भ.बापट

47) डॉ. बाबासाहेब आंबेडकर - शंकरराव खरात

48) एक माणूस एक दिवस भाग १ - ह.मो.मराठे

49) एक माणूस एक दिवस भाग २ - ह.मो.मराठे

50) एक माणूस एक दिवस भाग ३ - ह.मो.मराठे

51) आई - मोकझिम गार्की

52) स्वभाव , विभाव - आनंद नाडकर्णी

53) बलुत - दया पवार

54) कर्ण , खरा कोण होता - दाजी पणशीकर

55) स्वामी - रणजीत देसाई

56) वपुर्झा ( भाग १-२ ) - व. पु. काळे

57) पांगिरा - विश्वास पाटील

58) पानिपत - विश्वास पाटील

59) युंगंधर - शिवाजी सावंत

60) छावा - शिवाजी सावंत

61) श्रीमान योगी - रणजीत देसाई

62) जागर खंड – १ - प्रा. शिवाजीराव भोसले

63) जागर खंड – २ - प्रा. शिवाजीराव भोसले

64) चंगीजखान - उषा परांडे

65) आर्य चाणक्य - जनार्धन ओक

66) भारताचा शोध - पंडित जवाहरलाल नेहरू

67) गोष्टी माणसांच्या - सुधा मूर्ती

68) वाईज अंड आदर वाईज

69) उपेक्षितांचे अंतरंग - श्रीपाद महादेव माटे

70) माणुसकीचा गहिवर - श्रीपाद महादेव माटे

71) यश तुमच्या हातात - शिव खेरा

72) आमचा बाप अन आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

73) कोसला - भालचंद्र नेमाडे

74) बखर : एका राजाची - त्र्यं. वि. सरदेशमुख

75) मनोविकारांचा मागोवा - डॉ. श्रीकांत जोशी

76) नापास मुलांची गोष्ट - संपा. अरुण शेवते

77) एका कोळियाने - अन्रेस्ट हेमींग्वे

78) महानायक - विश्वास पाटील

79) आहे आणि नाही - वि. वा. शिरवाडकर

80) चकवा चांदण – एक विनोपनिषद - मारुती चितमपल्ली

81) शालेय परिपाठ - धनपाल फटिंग

82) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी

83) ग्रामगीता - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

84) अभ्यासाची सोपी तंत्रे - श्याम मराठे

85) यशाची गुरुकिल्ली - श्याम मराठे

86) हुमान - संगीता उत्तम धायगुडे

87) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे - श्याम मराठे

88) द्रुतगणित वेद - श्याम मराठे

89) तोत्तोचान - तेत्सुको कुरोयानागी

90) शिक्षक असावा तर …? - गिजुभाई

91) एका माळेचे मणी (गणित) - नागेश शंकर मोने

92) दिनदर्शिके मधील जादू - नागेश शंकर मोने

93) ऋणसंख्या - नागेश शंकर माने

94) गणित छःन्द भाग -२ - वा. के. वाड

95) गणित गुणगान - नागेश शंकर मोने

96) मण्यांची जादू - लक्ष्मण शंकर गोगावले

97) मनोरंजक शुन्य - श्याम मराठे

98) उत्तरातून प्रश्ननिर्मिती - नागेश शंकर मोने

99) क्षेत्रफळ आणि घनफळ - डॉ. रवींद्र बापट

100) संख्यांचे गहिरे रंग - प्रा. मोहन आपटे

मराठीमधील ही पुस्तकेच ‘सर्वोत्कृष्ट’ आहेत असे नाही. ही यादी फक्त माहिती म्हणून दिली आहे. यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या पुस्तकांचीही भर घालू शकता.