Union Budget 2019: भारताचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तो लाल रंगाच्या लेदर बॅग मधूनच आणण्यामागे आहे 159 वर्ष जूनी कहाणी, कशी सुरू झाली ही प्रथा?
भारताचा अर्थसंकल्प आणि लाल सुटकेसचं नातं | File image | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

Union Budget 2019: भारताचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी दिवशी सादर केला जातो. यंदा केंद्रीय मंत्री अरूण जेटली (Arun Jaitley) प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे अमेरिकेला असल्याने पियुष गोयल (Piyush Goyal) यंदाचं अंतरिम बजेट 2019 (Interim Budget 2019) सादर करणार आहेत. बजेट बनवण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ आहे. यामध्ये अनेक लोकांची कित्येक महिन्यांची मेहनत असते. दरवर्षी अर्थमंत्री संसदेमध्ये बजेट सादर करण्यापूर्वी खास लाल रंगाची बॅग (Red Leather Briefcase ) घेऊन लोकसभेत प्रवेश करतात. पण बजेट लाल सूटकेसमधूनच घेऊन जाण्यामागील नेमकं कारण काय आहे? हे तुम्हांला ठाऊक आहे का? Interim Budget म्हणजे काय? कसा तयार केला जातो भारताचा अर्थसंकल्प?

भारताचा अर्थसंकल्प आणि लाल सुटकेसचं नातं काय ?

1860 सालपासून अर्थसंकल्प लाल सूटकेसमधूनच आणला जातो.'बजेट' या शब्दाचं मूळ फ्रेंच शब्द  'बॉगेटी' मध्ये आहे. त्याचा अर्थ लेदर बॅग असा होतो. ब्रिटनमध्ये 1860 साली ब्रिटीश चान्सलर ऑफ एक्सचेकर चीफ विलियम एवर्ट ग्लॅडस्टन यांनी बजेटचे कागद एका लाल सूटकेसमधून आणले होते. या कागदांवर राणीने सोन्याचं मोनोग्राम केलं होतं. राणीनेच सुटकेस ग्लॅडस्टन यांना दिली होती. ब्रिटनमध्ये 2010 सालपर्यंत लाल सुटकेस वापरण्याची प्रथा होती. मात्र आता लेदर बजेट बॉक्स वापरला जातो.  सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?

बजेट सुटकेसमधून आता बजेट बॉक्समध्ये त्याचं रूपांतर झाल्याने रंगामध्ये थोडासा बदल झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र युपीए सरकारच्या काळामध्ये तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लाल रंगाची सुटकेस वापरली होती. Budget 2019: मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार?

मोदी सरकारचं यंदाच्या लोकसभेच्या कार्यकाळातील शेवटचं बजेट आहे. लवकरच निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या जातील. त्यामुळे मतदारांना खूष करणार्‍या कोणत्या आणि किती योजना जाहीर होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागलेले आहे.