Driving License New Rules: सरकारने बदलले ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचे नियम; काय आहे नवीन नियम, जाणून घ्या
Driving License (Photo Credit: PTI)

Driving License New Rules: तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) बनवणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केला आहे. सरकारने आता डीएलची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. जाणून घेऊया सरकारच्या या नव्या नियमाविषयी...

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात बदल केला आहे. नवीन नियमानुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत. हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. या नव्या बदलामुळे, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओच्या वेटिंग लिस्टमध्ये पडलेल्या करोडो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (हेही वाचा - Single Use Plastic Ban: 1 जुलैपासून 'या' प्लास्टिक वस्तूंवर बंदी; पकडल्यास भरावा लागेल 'इतका' दंड)

ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन घ्यावे लागेल प्रशिक्षण -

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आरटीओमध्ये चाचणीची वाट पाहणाऱ्या अर्जदारांना मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. आता ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकतात. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. अर्जदारांना शाळेकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे, अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.

जाणून घ्या काय आहेत नवीन नियम -

  • प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटीही जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रफळापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे.
  • अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांकडे किमान एक एकर जागा असेल. तसेच मध्यम आणि जड प्रवासी मालवाहू वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांसाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.
  • ट्रेनर किमान 12 वी पास असावा आणि त्याला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा. त्याला वाहतूक नियमांचे चांगले ज्ञान असावे.
  • मंत्रालयाने एक अध्यापन अभ्यासक्रम देखील विहित केला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी कमाल 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटर्सचा अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागला जाईल. सिद्धांत आणि व्यावहारिक.

लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहरातील रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ-उतार इत्यादींवर गाडी चालवायला शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतात. सिद्धांत भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांचा असेल, त्यात रस्ता शिष्टाचार समजून घेणे, रस्त्यावरील क्रोध, वाहतूक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि वाहन चालवण्याची इंधन कार्यक्षमता यांचा समावेश असेल.