Single Use Plastic Ban: प्लास्टिक (Plastic) चा अतिवापर मानवी जीवनासाठी घातक आहे. प्लॅस्टिकमुळे पुरासारख्या अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व रोखण्यासाठी सरकारही कठोर पावले उचलत आहे. यासाठी सरकारने देशात सिंगल यूज प्लॅास्टिक (Single Use Plastic) विरोधात कृती आराखडा तयार केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Central Pollution Control Board) एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, एक जुलैपासून एकेरी वापराचे प्लास्टिक वापरणाऱ्यावर किंवा विकणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून त्याला मोठा दंड भरावा लागणार आहे. यावेळी नियमांसोबतच एक अॅपही तयार करण्यात आले आहे. ज्याद्वारे कोणतीही व्यक्ती आपली तक्रार नोंदवू शकते. (हेही वाचा - Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही; सरकारने जारी केला आदेश)
सीपीसीबीने सिंगल यूज प्लॅस्टिकची यादीही जारी केली आहे. या यादीमध्ये त्या सर्व एकल वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा समावेश आहे. ज्यावर 1 जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
1 जुलैपासून या गोष्टींवर पूर्णपणे बंदी -
- कँडी स्टिक
- फुग्याची प्लास्टिकची काठी
- प्लास्टिकच्या काड्यांचे ईयर बड्स
- प्लास्टिकचे ध्वज
- आईस्क्रीम स्टिक
- प्लास्टिक कप
- प्लास्टिक पॅकिंग साहित्य
- प्लास्टिक आमंत्रण कार्ड
- सिगारेटची पाकिटे
- थर्माकोल
- प्लास्टिक प्लेट्स
- प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)
एकेरी वापराच्या प्लास्टिक वापरासाठी दंड -
सीपीसीबीने जारी केलेल्या सूचनांनुसार, जर एखादा दुकानदार पहिल्यांदा एकेरी वापराचे प्लास्टिक वापरताना पकडला गेला तर त्याला 500 रुपये, दुसऱ्यांदा 1000 आणि तिसऱ्यांदा 2000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच इंस्टीट्यूशनल स्तरावर, पहिल्या घटनेत 5000 रुपये, दुसऱ्या प्रकरणात 10,000 आणि तिसऱ्या प्रकरणात 20,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.