NPCI चे बँकांना आदेश, 31 डिसेंबर पर्यंत बंद होणार हे UPI आयडी; जाणून घ्या कारवाईचे कारण
(Photo Credits: AIR/ Twitter)

एक वर्ष कालावधीपेक्षाही अधिक काळ तुम्ही जर तुमचा यूपीआय आयडी (UPI ID) आणि नंबर वापरला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. यूपीआय नेटवर्क चालविणारी सरकारी एजन्सी एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारा बँकांना कळविण्यात आले आहे की, ते सर्व युपीआय आयडी आणि नंबर बंद करा ज्यांनी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी त्यावरुन कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला नाही. यूपीआय नेटवर्क सुरक्षीत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यूपीआय अॅपमध्ये Google Pay, Paytm आणि PhonePe यांचा समावेश आहे.बाचराचा एकूण आकार पाहिला तर यूपीआय पेमेंट हे देशातील सर्वात मोठे यूपीआय पेमेंट अॅ आहे.

एनपीसीआय द्वारा बँका आणि थर्ड पार्टी अॅप्सना अनएक्टीव्ह यूपीआय नंबर्स आणि आयडी बंद करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. एखाद्या वापरकर्त्याला जर वाटत असेल की, त्यांचे यूपीआय आयडी आणि नंबर नेटवर्क हटवायचे नसेल तर त्याला आपला यूपीआय अॅक्टीव्ह ठेवावा लागेल. यूपीआय आयडी आणि नंबर नेटवर्क हटविताना किंवा बंद करतान बँका आणि थर्ड पार्टी एप्सना यूजर्सचे ईमेल आणि मेसेजच्या माध्यमातून आगाऊ माहिती द्यावी लागेल. (हेही वाचा, PhonePe, Google Pay वर कसे डिलिट करतात UPI ID? घ्या जाणून)

एनपीसीआय ने म्हटले आहे की, ग्राहक आपला मोबाईल नंबर बदलतात. तरीही जुन्या नंबर्सना सिस्टममधून हटवले जात नाही. अशा वेळी आखलेल्या मार्गदर्शक सूचनांन्वये जुना नंबर आणखी एखाद्या नव्या ग्राहकाला देता येऊ शकतो. त्यामुळे सर्व बँक आणि थर्ड पार्टी अॅप्सना इनएक्टिव्ह यूपीआय आयडी आणि नंबर्सना हटवावे लागेल. ज्या वर्षभरात एकदाही ट्रॅंजेक्शन करण्यात आले नाही. (हेही वाचा, NPCI New Guideline: बंद होऊ शकतो तुमचा UPI आयडी, 31 डिसेंबरपर्यंत करावे लागेल 'हे' काम; जाणून घ्या सविस्तर)

UPI आयडी म्हणजे काय?

UPI आयडी, ज्याला युनिफाइड पेमेंट इंटरफेस आयडी म्हणूनही ओळखले जाते, हे डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी UPI प्रणालीमध्ये वापरले जाणारे एक अद्वितीय ओळखकर्ता आहे. हे वापरकर्त्यांसाठी अखंडपणे पैसे पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी एक ओळख पत्ता म्हणून कार्य करते.

NPCI म्हणजे काय?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI), भारतातील रिटेल पेमेंट्स आणि सेटलमेंट सिस्टम्स चालवणारी एक प्रमुख संस्था आहे. जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांचा पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमच्या तरतुदींअंतर्गत एक उपक्रम आहे. कायदा, 2007, भारतात एक मजबूत पेमेंट आणि सेटलमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) द्वारे 2008 मध्ये पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स कायदा, 2007 च्या तरतुदींनुसार सुरू केलेली एक महत्त्वाची आणि अग्रगण्य संस्था आहे. जीचे काम बँकांच्या एका संघाच्या मालकीच्या NPCI चे उद्दिष्ट भक्कम पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम तयार करणे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सिटी बँक, बँक ऑफ बडोदा आणि HSBC यासह दहा प्रमुख बँकांद्वारे NPCI चा प्रचार, वापर केला जातो. 2