PhonePe, Google Pay वर कसे डिलिट करतात  UPI ID? घ्या जाणून
Google Pay (Photo Credits-Twitter)

इंटरनेट बँकींगमध्ये अनेक गोष्टी आतापर्यंत बदलत गेल्या. तसे पाहता 2016 मध्ये UPI रिलीज करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत हा वेगाने पैसे ट्रान्स्फर करण्याची एक महत्त्वाची पद्धत बनली आहे. आता व्यक्तीसूद्धा अनेक UPI ID बनवू शकतो. याशिवाय या UPI IDला वेगवेगळ्या बँक अकाऊंटलाही जोडता येऊ शकते. Google Pay आणि PhonePe यांसारखे प्लॅटफॉर्मवर एका बँक अकाऊंटचे वेगवेगळे UPI ID समाविष्ठ करु शकता.

UPI ID आपण जेव्हा Google Pay आणि PhonePe वर क्रिएट करतो तेव्हा वेगवेगळे अॅड्रेस तयार होता. परंतू, हे अॅड्रेस अनेक वेळा आपल्या मनस्तापाचे कारणही ठरु शकतात. होय, कारण वेगवेगळे UPI ID लक्षात ठेवणे एक कठीणच काम. त्यामुळे आज आम्ही आपल्याला असाच एक पर्याय सांगणार आहोत. ज्याचा वापर करुन आपण अत्यंत सोप्या पद्धतीने UPI ID डिलीट सुद्धा करु शकतो. चला तर मग घ्या जाणून. (हेही वाचा, Airlines Offer : भारतातून ‘या’ देशात जाण्यासाठी करा फक्त 26 रुपयांत विमान प्रवास, एअरलाईन्स तर्फ प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर)

जाणून घ्या PhonePe वर कसे डिलिट करतात UPI ID

सर्वसाधारणपणे PhonePe वरती UPI ID '971XXXX@ybl' अशा स्वरुपात बनते. जेव्हा गूगल पेवर UPI ID आपल्या नावाच्या हिशोबाने बनते. Google Pay वर 'JaisinXXX@okicici' अशी बनते. पहिल्यांदा आपल्याला आपल्या PhonePe वर UPI ID डिलीट करण्याची पद्धत जाणून घ्यावी लागेल. त्या अकाऊंटवर क्लिक करुन जे आपण डिलिट करु इच्छिता. जर आपल्या UPI ID सेक्शनमध्ये UPI ID दिसू लागतील. आपल्याला Delete Button दिसेल त्यावर क्लिक करा. आपण सहजपणे UPI ID डिलीट करु शकता.