Airlines Offer : भारतातून ‘या’ देशात जाण्यासाठी करा फक्त 26 रुपयांत विमान प्रवास, एअरलाईन्स तर्फ प्रवाशांसाठी भन्नाट ऑफर
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

भारतातून (India) परदेशात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच शिक्षण (Education), नोकरी (Job), व्यवसाय (Business) या संबंधीत देखील बरेच भारतीय परदेशात जाताना दिसतात. तर असाच तुम्ही भारताबाहेर पर्यटनाला (Tourism) जाण्याचा विचार करत असाल तर व्हिएतनाम (Vietnam) हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण व्हिएतनामला विमान प्रवास करण्यासाठी तुम्हाला फक्त 26 रुपये मोजावे लागणार आहे. हो हे विमान प्रवासाचे भाडे नसुन ऑटो (Auto) प्रवासाचे भाडे तुम्हाला वाटू शकत पण व्हिएतनामच्या व्हिएतजेट (Viet Jet Airlines) एअरलाइन्स तर्फे ही भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. जर तुमची व्हिएतनाम फिरण्याची इच्छा आहे तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही.

 

पण संबंधीत एअरलाईन्स (Airlines) कडून देण्यात आलेल्या ऑफरवर काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. या ऑफरचा (Offer) लाभ घेण्यासाठी तुम्हाला 13 जुलै 2022 पर्यंत तिकीट बुक करावे लागेल. म्हणजे उद्या या प्रवासाचं तिकीट बुक (Ticket Booking) करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर तुम्हाला बुकींगस फक्त 26 मार्च 2023 नंतरच्या  प्रवासासाठी करता येणार आहे. तसेच संबंधीत विमान भारतातून फक्त नवी दिल्ली (New Delhi) आणि मुंबई (Mumbai) या विमानतळावरुन उपलब्ध असेल म्हणजे तुम्ही भारताच्या इतर कुठल्या शहरात असाल तर तुम्हाला नवी दिल्ली किंवा मुंबई विमानतळावरुन तुमचं विमान धराव लागणार आहे.  तसेच व्हितनामधील हनोई (Hanoi), हो ची मिन्ह सिटी (Ho Chi Minh City) आणि फु क्वोक (Phú Quốc) पर्यतच तिकीट व्हिएतजेट एअरलाइन्स तर्फे तुम्ही करु शकता.

 

व्हिएतजेट  एअरलाइन्स कंपनी फक्त 9,000 व्हिएतनामी डोंग (VND) च्या विमान भाड्यावर तिकीट ऑफर दिली आहे. व्हिएतनामी चलनाचे मूल्य भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. 9,000 व्हिएतनामी डोंग भारतीय चलनात फक्त 25 ते 30 रुपये इतके आहे. एअरलाइन्सची ही ऑफर सर्व देशांतर्गत (National) आणि आंतरराष्ट्रीय (International) मार्गावरील उड्डाणांसाठी आहे. पूर्वी व्हिएतजेटने एअरलाइन्स भारत ते व्हिएतनामधील फक्त 4 हवाई मार्गांवर आपली विमानसेवा सुरू केली होती. पण आता भारतातून 5 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद (Hyderabad), अहमदाबाद (Ahmedabad) आणि बंगळुरू (Bangalore) हे शहर अडा नांग शहराशी जोडले गेले आहेत.