पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या, विजेच्या धक्क्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी करा हे उपाय
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

इतक्या दिवसांच्या उन्हाच्या काहीलीनंतर अखेर राज्यात जवळजवळ सर्व ठिकाणी मान्सून पूर्ण पावसाचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी तर पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. पावसाळ्यात ज्या समस्या उद्भवतात त्यातील एक महत्वाची समस्या म्हणजे विजेचा धक्का (Electric Shock) लागणे. वरवर पाहता अतिशय छोटी वाटणारी ही समस्या फारच गंभीर आहे. काल मुंबईत झालेल्या पावसात भिजत असताना विजेचा धक्का लागून दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तर अशा अनेक घटना पावसाळ्यात घडत असतात. यासाठी काही काळजी घेणे अथवा काही उपाययोजना करणे गरजेचे आहे.

  • सर्वात आधी वादळामुळे तुटलेल्या वीज तारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजुचे फिडर पिल्रर, रोहित्राचे लोखंडी कुंपन, फ्युज बॉक्स, घरातील विद्युत उपकरणे, शेती पंपाचा स्वीच बोर्ड अशा गोष्टी तपासून पहा. कुठे काही समस्या आढळल्यास ताबडतोप दुरुस्त करून घ्या.
  • पावसाळ्यात विजेच्या तारांवर झाडे पडून त्या तुटण्याची शक्यता असते. या तारांमध्ये वीज प्रवाह असल्याने पाऊस सुरु असताना शक्यतो झाडाखाली थांबू नका.
  • पावसापुर्वीच घरातील वीज पुरवठ्याला आवश्यक अर्थिंग करून घ्या. घरात शॉर्टसर्कीट झाल्यास ताबडतोब मेन स्वीचवरून वीज पुरवठा बंद करावा.
  • घरातील स्वीच, वायर, तारा यांना ओलावा लागणार नाही याची काळजी घ्या.
  • विजेच्या खांबांना जनावरे बांधू नका किंवा दुचाकी टेकवून ठेऊ नका. तसेच विजेच्या तारांवर कपडे वाळत घालू नये.
  • वीज तपासून पाहण्याकरिता आपल्या हातांचा केव्हाही उपयोग करू नये. त्यासाठी टेस्टर सारखे उपकरण वापरावे.
  • आकाशातून पडणाऱ्या विजेपासून वाचण्यासाठी, इमारतीवर लायटनिंग अरेस्टर बसवावे. हे त्रिशूलाच्या आकारासारखे असून वीज पडल्यास, विजेचा करंट यांच्यामार्फत संपूर्ण इमारतीवर जाता, तो जमिनीत सोडला जातो व इमारत सुरक्षित राहते.
  • वाहेर विजा चमकत असताना मोबाइल, इंटरनेट जोडणी असलेले संगणक, टिव्ही, दुरध्वनी यांचा वापर करु नये, वीज यामुळे आकर्षित होवू शकते. (हेही वाचा: मुंबई: पाण्यात खेळणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना विजेचा धक्का लागून मृत्यू)काही वेळा आकाशातील वीज पडूनही अपघात होण्याची शक्यता असते. अशावेळी झाडाखाली न थांबता ताबडतोब घर. इमारत, किंवा कोणत्याही बंद जागेचा आसरा घ्या. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास 1800-102-3435 किंवा 1800-233-3435, 19120, 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.