प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईत (Mumbai) बुधवारी (10 जून) रात्री कडाक्याच्या विजांसह जोरदार पाऊस पडला. त्यावेळी लहान मुले पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर नाचताना दिसून आली. मात्र पोईसर येथील दोन अल्पवयीन मुले पावसाच्या पाण्यात खेळण्यास गेली असता त्यांना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

काल पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला. मात्र पोईसर मध्ये राहणारे तुषार आणि रिषभ हे दोघे पावसात मजा-मस्ती करण्यासाठी घराबाहेर गेले होते. तेथे घराबाहेरच असलेल्या लोखंडी शिडीच्या बाजून एक इलेक्ट्रिक वायर सोडली होती. या सोडलेल्या वायरचा करंट लोखंडी शिडीमध्ये पास झाल्याने या दोघांनी नेमका त्याच वेळी शिडीला हात लावला.

(Cyclone Vayu मुळे मुंबई शहराला धोका नाही; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आवाहन)

या प्रकरणी दोघांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच रिषभ आणि तुषार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे दोन्ही मुलांच्या घरातील मंडळींना धक्का बसला आहे.