Bank Locker Rules: केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँक लॉकर करारांचे टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच ज्यांचे बँकेत लॉकर आहे, त्यांना बँकेत जाऊन 31 डिसेंबर 2022 पर्यंत नवीन लॉकर अॅग्रीमेंट (Bank Locker Agreement) सादर करावा लागेल. तुम्ही तुमच्या बँक लॉकर अॅग्रीमेंट रिन्यू (Bank Locker Agreement Renewal) न केल्यास, तुमचे बँक लॉकर जप्त केले जाईल.
बँक लॉकर अॅग्रीमेंट रिन्यू कसे करावे?
लॉकर अॅग्रीमेंट रिन्यू करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. यानंतर तुम्हाला बँक लॉकर कराराचे नूतनीकरण करण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा लागेल. यानंतर बँकेकडून स्टॅम्प पेपर आणि ई-स्टॅम्पिंग इत्यादी सुविधा पुरविल्या जातील. बँक लॉकर कराराचे नूतनीकरण केल्यानंतर, त्याची एक प्रत तुम्हाला बँकेकडून दिली जाईल. (हेही वाचा - SBI Hikes Interest Rate: एसबीआयचे कर्ज झाले महाग; गृहकर्ज, वाहन आणि वैयक्तिक कर्जासाठी EMI वाढणार, 'येथे' पहा नवीन व्याजदर)
लॉकर अॅग्रीमेंट रिन्यू करण्याचे फायदे -
लॉकर सुरक्षा:
लॉकर अॅग्रीमेंट रिन्यू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँक नंतर तुमच्या सामानाच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार असेल, जेणेकरुन चोरी, आग, दरोडा, फसवणूक आणि बँकेची इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये तुमच्या सामानाचे कोणतेही नुकसान होणार नाही.
लॉकर जप्त होणार नाही:
बँक लॉकर कराराचे नूतनीकरण करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचे लॉकर जप्त केले जाणार नाही. तुम्ही तुमचे सामान लॉकरमध्ये सहजपणे ठेवू किंवा बाहेर काढू शकाल. (हेही वाचा -NPCI चे बँकांना आदेश, 31 डिसेंबर पर्यंत बंद होणार हे UPI आयडी; जाणून घ्या कारवाईचे कारण)
भरपाई:
बँक लॉकर कराराचे नूतनीकरण केल्यानंतर, जर तुमच्या सामानाचे काही नुकसान झाले असेल आणि ती बँकेची चूक असेल, तर तुम्हाला त्याची भरपाई देखील मिळेल. नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पूर यांसारख्या कृत्यांमुळे लॉकरमधील कोणत्याही वस्तूचे नुकसान झाल्यास बँक जबाबदार नाही.