आरबीआयने (RBI) जारी केलेल्या ताज्या परिपत्रकानुसार, अजूनही 2.7% 2000 च्या चलनी व्यवहारातील नोटा बाजारात आहेत. 7 ऑक्टोबर पर्यंत नागरिकांना बॅंकेमध्ये जाऊन नोटा बदलण्याची वेळ दिली होती. 19 मे 2023 रोजी, ज्या दिवशी RBI ने 2000 ची नोट मागे घेण्याचा निर्णय घेतला त्या तारखेला व्यवहाराच्या समाप्तीच्या वेळी चलनात असलेल्या रु. 2000 च्या नोटांचे एकूण मूल्य रु. 3.56 लाख कोटी होते. 30 नोव्हेंबरपर्यंत ते 9,760 कोटी रुपये होते. अद्यापही तुमच्याकडे 2000 ची नोट असेल आणि ती बदलून किंवा डिपॉझिट करून घ्यायची असल्यास आरबीआय कडून संधी देण्यात आली आहे. नक्की वाचा: Rs 2,000 च्या 97.26% नोटा आल्या परत; RBI कडून दोन हजारच्या नोटा अजूनही Legal Tender असल्याची माहिती .
2000 ची नोट बदलण्यासाठी आता काय करावं लागेल?
- आता 2000 ची नोट बदलण्याची किंवा डिपॉझिट करण्याची संधी देशातील केवळ 19 आरबीआय रिजनल ऑफिस मध्ये करण्यात आली आहे. देशात सध्या अहमदाबाद, बेंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदिगढ, चैन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरूअनंतपुरम इथे करण्यात आली आहे. इथे पहा या 19 ऑफिसचे सवित्तर पत्ते!
- तुम्ही या 19 आरबीआय रिजनल ऑफिस जवळ राहत नसाल तर तुमची 2000 ची नोट तुम्ही भारतीय पोस्ट द्वारा देशांतर्गत कोणत्याही कार्यालयामध्ये पोस्टाद्वारा पाठवू शकता. त्याची रक्कम बॅंक अकाऊंट मध्ये क्रेडिट केली जाईल.
सध्या अनेक रिजनल ऑफिस बाहेर नागरिकांची 2000 ची नोट डिपॉझिट किंवा बदलून घेण्यासाठी रांग दिसत आहे.
97.26% of the Rs 2,000 banknotes in circulation as of May 19, 2023, have returned. The Rs 2,000 banknotes continue to be legal tender: RBI pic.twitter.com/rSxx8hv4By
— ANI (@ANI) December 1, 2023
पहिल्यांदा जारी केलेल्या अंतिम मुदतीनुसार, 30 सप्टेंबर पर्यंत बॅंकेत नोटा जमा करण्यास आरबीआयने सांगितले होते नंतर त्याला 7 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण ही मुदत संपल्यानंतर आता आरबीआय उर्वरित नोटा परत करण्यासाठी आवाहन करत आहे. तसेच अद्याप 2000 नोटा या वैध चलन म्हणून पाहिल्या जात असल्याचेही नमूद केले आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून काढल्यानंतर 2000 च्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. या नोटा जारी करण्याचा उद्देश साध्य झाल्यानंतर 2018-19 पासून त्याची छपाई बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.