सध्याच्या घडीला कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड नंबर ची आवश्यकता भासते. बँकेत खाते उघडण्यापासून 2 लाखांहून अधिक रुपयांचे सोने खरेदी करताना पॅन कार्ड (PAN Card) देणे अनिवार्य आहे. तसंच बँकेत 50 हजारहून अधिक रक्कम भरण्यासाठीही पॅन कार्ड गरजेचे असते. त्यामुळे पॅन कार्ड सारखे महत्त्वाचे ओळखपत्र खरे असणे गरजेचे आहे. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊननंतर बनावट पॅन कार्ड देऊन लोकांची फसणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड बनावट तर नाही ना? हे तपासून पाहाणे, अत्यंत गरजेचे आहे. याची माहिती तुम्ही घरबसल्या अवघ्या काही सेकंदात प्राप्त करु शकता. यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या (Income Tax Department) मदतीने तुम्ही हे काम करु शकता. (Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?)
खालील स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या, पॅन कार्डची सत्यता:
# सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला www.incometaxindiaefiling.gov.in भेट द्या.
# तिथे तुम्हाला डाव्या बाजूला ‘Verify Your PAN Details’ हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा.
# त्यानंतर तुम्हाला तेथे पॅन कार्ड डिटेल्स भरावे लागतील.
# पॅन नंबर, पॅन कार्ड वरील पूर्ण नाव, जन्म तारीख इत्यादी माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करा.
# त्यानंतर पोर्टलवर एक मेसेज दिसेल त्यावरुन तुमच्या पॅन कार्डवरील माहिती चेक करा.
# अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्डची सत्यता तपासू शकाल.
आयकर विभागानुसार जर पॅन कार्ड 31 मार्च 2021 पर्यंत आधार कार्डशी लिंक न केल्यास ते निष्क्रीय होईल. गेल्या महिन्यात तब्बल 32.71 कोटींहून अधिक पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहेत. UIDAI 12 अंकांचे आधार कार्ड जारी करतात. तर आयकर विभागाकडून देण्यात येणारे पॅन कार्ड 10 अंकी असते. मात्र पॅन कार्ड वरील नंबर अल्फान्युमरीक असतो. म्हणजेच त्यावर इंग्रजी अक्षरं (अल्फाबेट्स) आणि नंबर्स असतात.